Headlines

7 Accused Arrested; Online Exam Prep


राज्यातील शिक्षक पात्रता परीक्षा (महाटीईटी) पेपरफुटी प्रकरणात तपास करणाऱ्या पोलिसांना आणखी मोठे यश मिळाले आहे. या प्रकरणात गुरुवारी आणखी तीन आरोपींना बिहार आणि हरियाणामधून अटक करण्यात आली. याआधी एका महिलेसह चार जणांना अटक करण्यात आली होती. त्यामुळे आ

.

बिहार आणि हरियाणातून आरोपींच्या मुसक्या आवळल्या

टीईटी पेपरफुटी प्रकरणाचा तपास राज्याबाहेर पोहोचला असून, पोलिसांनी बिहारमधील समस्तीपूर आणि हरियाणातील सोनिपत येथे कारवाई केली. या कारवाईत समस्तीपूर येथून सोनूकुमार सिंह (33) आणि मिथुनकुमार सिंह (34) यांना अटक करण्यात आली. तर हरियाणातील सोनिपत येथून कपिल कृष्णा दहिया (41) याच्या मुसक्या आवळण्यात आल्या. या तिघांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 9 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. या काळात पेपरफुटीचे संपूर्ण नेटवर्क, आर्थिक व्यवहार, इतर साथीदार आणि पेपर लीकची साखळी याबाबत चौकशी केली जाणार आहे.

राज्याबाहेर पसरलेल्या रॅकेटचा तपास

तिन्ही आरोपी वेगवेगळ्या राज्यांमधून अटक झाल्याने या प्रकरणाचे जाळे केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे तपास यंत्रणा आता विविध राज्यांतील संपर्क, आर्थिक व्यवहार, डिजिटल पुरावे आणि परीक्षेशी संबंधित इतर व्यक्तींची चौकशी करत आहे. आतापर्यंत सात आरोपी अटकेत असून, या प्रकरणात आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

पेपरफुटीविरोधात राष्ट्रवादी शरद पवार गटाचा मोर्चा

दरम्यान, टीईटी, नीट आणि एमपीएससीसारख्या स्पर्धा परीक्षांमधील पेपरफुटीच्या घटनांविरोधात गुरुवारी भंडारा येथे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला. मोर्चादरम्यान निवासी उपजिल्हाधिकारी फाळके यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. परीक्षांमधील गैरप्रकार रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याची मागणी आंदोलकांनी केली.

आता टीईटी परीक्षा ऑनलाइन होणार?

पेपरफुटीनंतर पुढे ढकलण्यात आलेल्या महाटीईटी 2026 परीक्षेबाबतही महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. पुढील काळात परीक्षा अधिक सुरक्षित आणि पारदर्शक करण्यासाठी ती संगणकाधारित (Computer Based Test – CBT) म्हणजेच ऑनलाइन पद्धतीने घेण्याचा विचार सुरू झाला आहे. यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने मुंबईस्थित इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन (IBPS) या संस्थेला पत्र पाठवले असून, शक्य तितक्या लवकर ऑनलाइन परीक्षा आयोजित करण्याबाबत सहकार्याची विनंती केली आहे.

6 लाखांहून अधिक उमेदवारांचे भविष्य अधांतरी

महाटीईटी परीक्षा 28 जून रोजी राज्यभर होणार होती. या परीक्षेसाठी मोठ्या प्रमाणावर उमेदवारांनी अर्ज केले होते. पेपर क्रमांक 1 साठी 2 लाख 58 हजार 61 उमेदवार, तर पेपर क्रमांक 2 साठी 3 लाख 42 हजार 64 उमेदवार अशा एकूण 6 लाख 125 उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज भरले होते. या परीक्षेसाठी राज्यभरात 1,729 परीक्षा केंद्रे निश्चित करण्यात आली होती. सकाळ आणि दुपार अशा दोन सत्रांमध्ये परीक्षा घेण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, पेपरफुटी उघडकीस आल्यानंतर परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला.

ऑनलाइन परीक्षा घेण्यामागचा उद्देश

पेपरफुटीच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पारंपरिक प्रश्नपत्रिका छपाई, वाहतूक आणि वितरण प्रक्रियेतील धोके कमी करण्यासाठी ऑनलाइन परीक्षा हा पर्याय पुढे आला आहे. ऑनलाइन पद्धतीमुळे प्रश्नपत्रिका गुप्त ठेवणे, परीक्षा केंद्रांवर नियंत्रण ठेवणे आणि उमेदवारांच्या हालचालींवर डिजिटल देखरेख ठेवणे अधिक सोपे होणार असल्याचे परीक्षा परिषदेकडून मानले जात आहे. दरम्यान, एका बाजूला पेपरफुटी प्रकरणातील आरोपींची संख्या वाढत असताना, दुसऱ्या बाजूला भविष्यात अशा प्रकारचे गैरप्रकार टाळण्यासाठी महाटीईटी ऑनलाइन घेण्याच्या हालचालींना वेग आला आहे. त्यामुळे लाखो उमेदवारांचे लक्ष आता तपासाच्या पुढील टप्प्यासोबतच नव्या परीक्षा वेळापत्रकाकडे लागले आहे.

संबंधित बातम्या वाचा…

उद्या होणाऱ्या TET परीक्षेचा पेपर फुटला, परीक्षा रद्द:भिवंडीतून प्रश्नपत्रिका विकणारे पोलिसांच्या ताब्यात; विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल

राज्यातील शिक्षक पात्रता परीक्षा (TET) पुन्हा एकदा पेपरफुटीच्या वादात अडकली आहे. ठाणे जिल्ह्यात उद्या होणाऱ्या टीईटी परीक्षेची प्रश्नपत्रिका आधीच बाहेर आल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर मोठी कारवाई करण्यात आली. या पार्श्वभूमीवर उद्या होणारी परीक्षा स्थगित करण्यात आल्याची माहिती समोर आली असून, शिक्षण विभागाकडून याबाबत अधिकृत आदेश जाहीर होण्याची शक्यता आहे. ठाणे जिल्ह्यातून पेपरफुटी झाल्याची माहिती समोर आली असून, या प्रकरणी पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्यामुळे देशभरात नीट (NEET) परीक्षा पेपरफुटी प्रकरणानंतर आता आणखी एका महत्त्वाच्या स्पर्धा परीक्षेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. येथे वाचा सविस्तर बातमी

पेपरफुटीवरून विरोधकांचे प्रश्न अन् सरकारची परीक्षा:टीईटी पेपरफुटीतील दोषींवर‘मकोका’ लावणार- दादा भुसे

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) २०२६ च्या पेपरफुटी प्रकरणावरून सोमवारी राज्य विधानसभेत अभूतपूर्व गदारोळ झाला. या प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्याची घोषणा शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी विधानसभेत केली. तसेच दोषींवर थेट ‘मकोका’अंतर्गत कारवाईसाठी कायद्यात आवश्यक बदल तपासण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. फेरपरीक्षेसाठी उमेदवारांकडून कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही, असेही भुसे यांनी स्पष्ट केले.सविस्तर वाचा

टीईटी पेपरफुटीवरून काँग्रेस आक्रमक:शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या ताफ्याला दाखवले काळे झेंडे, राजीनाम्याची मागणी

राज्यात टीईटी (TET) परीक्षेचा पेपर फुटल्याने विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट असतानाच, आता या प्रकरणाचे थेट पडसाद रस्त्यावर उमटू लागले आहेत. टीईटी पेपरफुटीच्या निषेधार्थ काँग्रेस कार्यकर्त्यांनी थेट शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवत तो अडवण्याचा प्रयत्न केला. “भ्रष्ट सरकारचा निषेध असो”, “विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ थांबवा” अशा जोरदार घोषणा देत कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला. या आक्रमक आंदोलनामुळे मंत्र्यांच्या सुरक्षेची आणि पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.