Headlines

डिग्रस कऱ्हाळेमध्ये अन्नदानाची 57 वर्षाची परंपरा कायम:15 क्विंटलच्या पोळया अन 8 क्विंटल बुंदीचा महाप्रसाद, 22 हजार भाविकांची घेतला लाभ




हिंगोली तालु्क्यातील डिग्रस कऱ्हाळे येथे अन्नदानाची 57 वर्षाची परंपरा यावर्षीही कायम राहिली असून गुरुवारी ता. 2 रात्री सात वाजता संत गजानन महाराजांच्या दिंडीचे स्वागत करून महाराप्रसादाचा कार्यक्रम झाला. यावेळी तब्बल 22 हजार भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला असून त्यासाठी 15 क्विंटल पोळ्या, 8 क्विंटल बुंदी, 5 क्विंटल भाजी करण्यात आली होती. श्रीक्षेत्र शेगाव येथील संत गजानन महाराज संस्थानच्या पायी दिंडी सोहळा डिग्रस कऱ्हाळे गावासाठी उत्साहाची पर्वणीच असते. या सोहळ्याच्या स्वागतासाठी आकर्षक रांगोळ्या काढल्या जातात या शिवाय टाळ, मृदंगाच्या गजरात दिंडीचे स्वागत केले जाते. विशेष म्हणजे यावेळी आयोजित महाप्रसादाची सेवा सर्वच गावकऱ्यांना मिळावी यासाठी जमा झालेले गव्हाचे पिठ सर्व घरांमध्ये वाटप करून त्याच्या पोळ्या तयार करून आणल्या जातात.
दरम्यान, गुरुवारी ता. 2 रात्री सात वाजता संत गजानन महाराजांच्या दिंडीचे डिग्रस कऱ्हाळे येथील कमानीजवळ उत्स्फुर्त स्वागत करण्यात आले. त्यानंतर टाळ मृदंगाचा गजर करीत दिंडीचा गावात प्रवेश झाला. यावेळी सर्वच गावकऱ्यांनी तसेच उपस्थित भाविकांनी दिंडीचे स्वागत केले. दिंडीचा गावात प्रवेश झाल्यानंतर महाआरतीचा कार्यक्रम झाला. त्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी डिग्रस कऱ्हाळे सह परिसरातील गावकरी महाप्रसाद घेण्यासाठी हजर होते. रात्री उशीरा पर्यंत महाप्रसादाचा कार्यक्रम चालला. यावेळी तब्बल 22 हजार भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. महाप्रसादासाठी 15 क्विंटलच्या पोळ्या, 8 क्विंटलची बुंदी, 5 क्विंटलची भाजी, 4 क्विंटलची डाळ, 5 क्विंटलचा भात तयार करण्यात आला होता. गावातील सुमारे 2 हजार पेक्षा अधिक स्वयंसेवकांनी महाप्रसादाचे वाटप केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *