![]()
राज्यातील दोन प्रमुख महामार्गांवर वाहनांना अचानक भीषण आग लागल्याच्या घटना नुकत्याच समोर आल्या आहेत. वाशिम जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर एका धावत्या कारने अचानक पेट घेतला, तर दुसरीकडे दौंडजवळ पुणे-सोलापूर महामार्गावर एका उभ्या मालवाहू टेम्पोला आग लागली. सुदैवाने, या दोन्ही थरारक घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसून, प्रवाशांचे प्राण थोडक्यात बचावले आहेत. मात्र, दोन्ही वाहने जळून खाक झाली आहेत. काही क्षणांतच कारने पेट घेतला पहिली घटना वाशिम जिल्ह्याच्या हद्दीत मालेगावजवळ समृद्धी महामार्गावर घडली. महामार्गावरून वेगात जाणाऱ्या एका कारमधून अचानक धूर येऊ लागला आणि काही क्षणांतच कारने पेट घेतला. आग इतकी भीषण होती की पाहता पाहता संपूर्ण कार आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आणि तिची अक्षरशः राखरांगोळी झाली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. या आगीमुळे महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसून, आग नेमकी कोणत्या कारणामुळे लागली याचा पुढील तपास यंत्रणा करत आहेत. पुणे-सोलापूर महामार्गावर टेम्पो भस्मसात
दुसरी घटना दौंड हद्दीत पुणे-सोलापूर महामार्गावर घडली. एका पंजाबी धाब्याजवळ पार्क करून ठेवलेल्या मालवाहू टेम्पोला अचानक भीषण आग लागली. आगीने रौद्ररूप धारण केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. सुदैवाने, वेळीच उपाययोजना करून या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. गाडी उभी असल्याने मोठा अनर्थ टळला आणि यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. हेही वाचा.. अंधेरीत एसआरए इमारतीला भीषण आग:जीव वाचवण्यासाठी रहिवाशांची धडपड, तिसऱ्या-चौथ्या मजल्यावरून मारल्या उड्या अंधेरी पश्चिम परिसरातील एका एसआरए (SRA) इमारतीला आज, ३ जुलै रोजी भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आगीमुळे इमारतीत प्रचंड धूर पसरल्याने मोठा हाहाकार उडाला. आगीच्या भक्ष्यस्थानी पडण्याच्या भीतीने काही हताश रहिवाशांनी चक्क तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यावरून खाली उड्या मारल्याचा थरारक प्रकार समोर आला आहे. अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवले असून, बचावकार्य अद्याप सुरू आहे. सविस्तर वाचा जालन्यात भीषण अपघात: दोन बसची समोरासमोर धडक; 25 शाळकरी मुलांसह 30 जण जखमी, दोन्ही चालक गंभीर जालना-वडीगोद्री महामार्गावर शनिवारी सकाळी एक भीषण अपघात झाला आहे. शहापूरजवळील गल्हाटी नदीच्या पुलावर दोन एसटी बसेसची समोरासमोर जोरदार धडक झाली. या काळजाचा ठोका चुकवणाऱ्या अपघातात ‘मानव विकास मिशन’च्या बसमधून प्रवास करणाऱ्या २५ शाळकरी विद्यार्थ्यांसह सुमारे ३० प्रवासी जखमी झाले आहेत. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र दोन्ही बसेसचे मोठे नुकसान झाले असून दोन्ही चालक गंभीर जखमी झाले आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रकृती बिघडली:ठाण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू; सर्व नियोजित कार्यक्रम रद्द राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अचानक ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांतील सततची धावपळ यामुळे त्यांची प्रकृती बिघडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्यांना तीव्र ताप आणि प्रचंड अशक्तपणा जाणवू लागल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे शिवसेनेतील सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. सविस्तर वाचा राज्यात पावसाचा जोर कायम:मुंबईत सलग चौथ्या दिवशी मुसळधार, कोकणात रेड अलर्ट; विदर्भातही पावसाचा जोर राज्यभरात पावसाचा जोर कमालीचा वाढला असून आज (४ जुलै) देखील बहुतांश ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा कडक इशारा देण्यात आला आहे. जून महिना पूर्णपणे कोरडा गेल्यानंतर जुलैच्या पहिल्याच आठवड्यात वरुणराजाने धडाकेबाज बॅटिंग सुरू केल्याने बळीराजा सुखावला आहे, मात्र नागरी भागात जनजीवन विस्कळीत झाले आहे. हवामान खात्याने मुंबई शहरासह ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या किनारपट्टीच्या जिल्ह्यांमध्ये ४ ते ६ जुलै दरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई, नवी मुंबई, ठाणे, भिवंडी, पालघर आणि कल्याण-डोंबिवलीमधील शाळांना प्रशासनाने तातडीने सुट्टी जाहीर केली आहे. सविस्तर वाचा
Source link
राज्यात महामार्गांवर अग्नितांडव:समृद्धीवर धावत्या कारने घेतला पेट, तर दौंडमध्ये टेम्पो भस्मसात; सुदैवाने जीवितहानी नाही