Headlines

Mumbai Manhole Death: Contractor Absconding; Probe Intensifies


अंधेरीतील साकीनाका परिसरात उघड्या मॅनहोलमध्ये पडून 55 वर्षीय अस्लम शेख यांचा मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर पोलिसांनी तपासाची गती वाढवली आहे. या प्रकरणात कंत्राटदारासह संबंधित कामगारांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, घटनास्थळी काम क

.

उघड्या मॅनहोलमुळे गेला जीव

गुरुवारी साकीनाका येथील खैरानी रोड परिसरात उघड्या मॅनहोलमध्ये पडून अस्लम शेख यांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळेच हा अपघात घडल्याचा प्राथमिक संशय व्यक्त करण्यात आला. या प्रकरणी मुंबई महापालिकेच्या एल विभाग कार्यालयातील अधिकाऱ्यांनी साकीनाका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार कंत्राटदार आणि घटनास्थळी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांविरोधात भारतीय न्याय संहितेअंतर्गत सदोष मनुष्यवधासह संबंधित कलमांनुसार गुन्हा नोंदवण्यात आला.

तीन मजूर ताब्यात; कंत्राटदाराचा शोध सुरू

गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. घटनास्थळी काम करणाऱ्या तीन मजुरांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून कंत्राटदाराची माहिती आणि कामकाजाबाबत चौकशी सुरू आहे. पोलिसांनी कंत्राटदाराचा शोध घेण्यासाठी स्वतंत्र पथके तयार केली असून, तो अद्याप फरार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

‘वर्क ऑर्डर’ होती का? तपासाचा महत्त्वाचा मुद्दा

तपासादरम्यान आणखी एक महत्त्वाचा मुद्दा समोर आला आहे. प्राथमिक माहितीनुसार, संबंधित ठिकाणी काम करण्यासाठी अधिकृत ‘वर्क ऑर्डर’ देण्यात आली होती की नाही, याचीही चौकशी सुरू आहे. काही अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, त्या ठिकाणी काम करण्याची आवश्यकता नव्हती आणि अधिकृत परवानगीशिवाय काम सुरू झाले होते का, याचाही तपास केला जात आहे. यासंदर्भात महापालिकेच्या संबंधित विभागातील अधिकाऱ्यांकडूनही माहिती मागवण्यात आली आहे.

चेंबूर आणि साकीनाका दुर्घटनांनंतर महापालिका सतर्क

साकीनाका दुर्घटनेपूर्वी चेंबूरमध्ये झाड कोसळून शाळेच्या व्हॅनमधील 10 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याने मुंबई महापालिकेच्या पावसाळी व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या दोन्ही घटनांनंतर महापालिकेने स्वतंत्र चौकशी सुरू केली असून, विविध सुरक्षा उपाययोजनांचाही आढावा घेतला जात आहे.

चेंबूर दुर्घटनेच्या चौकशीत प्राथमिक निष्कर्ष काय?

चेंबूर येथील झाड कोसळण्याच्या घटनेची चौकशी करण्यासाठी महापालिकेने दोन सदस्यीय समितीची नियुक्ती केली आहे. समितीने वृक्षतज्ज्ञांच्या मदतीने घटनास्थळी पाहणी केली. प्राथमिक तपासात रस्त्याचे उत्खनन आणि काँक्रीटीकरणाच्या कामादरम्यान झाडाच्या एका बाजूच्या आधार देणाऱ्या मुळांचे नुकसान झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. यामुळे झाडाच्या मुळांमध्ये अंतर्गत कुज निर्माण झाली. त्यानंतर मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे कमकुवत झालेले झाड कोसळल्याचा प्राथमिक निष्कर्ष समितीने नोंदवला आहे.

मुंबईतील सर्व मॅनहोलची तपासणी सुरू

साकीनाका दुर्घटनेनंतर मुंबई महापालिकेने शहरातील सर्व मॅनहोलची विशेष तपासणी सुरू केली आहे. महापालिकेच्या माहितीनुसार, मुंबईत एकूण 1 लाख 3 हजार 926 मॅनहोल आहेत. त्यापैकी 4 हजार 446 मॅनहोलवर संरक्षक जाळ्या बसविण्याचे काम सुरू आहे. गुरुवार आणि शुक्रवार या दोन दिवसांत 16 हजार 623 मॅनहोलची तपासणी पूर्ण करण्यात आली आहे. उर्वरित मॅनहोलचीही टप्प्याटप्प्याने तपासणी केली जाणार असून, आवश्यक त्या ठिकाणी तातडीने सुरक्षा उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

दुर्घटनांनंतर प्रशासनावर वाढला दबाव

चेंबूर आणि साकीनाका येथील सलग दोन गंभीर दुर्घटनांमुळे मुंबई महापालिकेच्या पावसाळी नियोजनावर प्रश्न उपस्थित होत आहेत. एका बाजूला पोलिसांकडून साकीनाका प्रकरणातील जबाबदारांवर कारवाईची प्रक्रिया सुरू आहे, तर दुसऱ्या बाजूला महापालिका शहरभरातील झाडे आणि मॅनहोलची व्यापक तपासणी करत आहे. दरम्यान, साकीनाका प्रकरणातील मुख्य कंत्राटदार कधी अटकेत येतो, तसेच तपासातून निष्काळजीपणाबाबत आणखी कोणती माहिती समोर येते, याकडे मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.

संबंधित बातमी वाचा…

साकीनाका मॅनहोल दुर्घटना:अमित साटम यांच्या हसण्यावरून राज ठाकरेंचे फडणवीसांना खरमरीत पत्र, तर राऊतांचा ‘मौत के सौदागर’ म्हणत घणाघात

साकीनाका येथे उघड्या मॅनहोलमध्ये पडून एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या घटनेवरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या गंभीर घटनेवर भाजपचे मुंबईतील आमदार अमित साटम हे हसल्याचा प्रकार समोर आल्यानंतर सर्वच स्तरांतून संताप व्यक्त केला जात आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खरमरीत पत्र लिहून भाजपच्या असंवेदनशीलतेवर बोट ठेवले आहे, तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनीही भाजपला ‘मौत के सौदागर’ म्हणत लक्ष्य केले आहे. येथे वाचा सविस्तर बातमी

मुंबईत 25 फूट खोल उघड्या मॅनहोलमध्ये पडून एकाचा मृत्यू:फोनवर बोलत चालली होती व्यक्ती, दुसऱ्या मॅनहोलमध्ये सापडला मृतदेह, 4 अधिकाऱ्यांचे निलंबन

मुंबईत एकीकडे पावसाने हाहाकार उडवला असताना, दुसरीकडे पालिका प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे निष्पाप मुंबईकरांचे बळी जात आहेत. कुर्ला-साकीनाका परिसरातील खैराणी रोडवर मोबाईलवर बोलत चाललेल्या एका 45 वर्षीय व्यक्तीचा उघड्या मॅनहोलमध्ये पडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. असलम अन्सारी असे या मृत व्यक्तीचे नाव असून, या घटनेमुळे मुंबईत एकच खळबळ उडाली आहे. प्रशासनाच्या या निष्काळजीपणावर चहुबाजूंनी संताप व्यक्त होत आहे. सविस्तर वाचा…

साकीनाका मॅनहोल दुर्घटनेत मोठा खुलासा:सुरक्षिततेसाठी मॅनहोल उघडला, पण नियमच पाळले नाहीत; पालिका आयुक्त अश्विनी भिडेंची कबुली

साकीनाका येथे उघड्या मॅनहोलमध्ये पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याच्या धक्कादायक घटनेनंतर मुंबई महापालिका प्रशासनाने मोठा खुलासा केला आहे. ही दुर्घटना मॅनहोल सुरक्षित करण्यासाठी जाळी बसविण्याचे काम सुरू असतानाच घडली, मात्र कामादरम्यान आवश्यक सुरक्षा उपायांचे पालन करण्यात आले नाही, अशी कबुलीच मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या घटनेची गंभीर दखल घेत महापालिकेने संबंधित चार अधिकाऱ्यांना तत्काळ निलंबित केले असून संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी अतिरिक्त आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती नेमण्यात आली आहे. सविस्तर वाचा…

साकीनाका मॅनहोल दुर्घटना:महापौरांवरही कारवाई व्हायलाच हवी, सत्ताधाऱ्यांकडून केवळ कॉन्ट्रॅक्टर्सची सेवा – आदित्य ठाकरे

मुंबईतील साकीनाका येथील मॅनहोल दुर्घटनेनंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी महापालिका प्रशासन, भाजप आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली. मुंबईत पावसाळ्यापूर्वीची कामे पूर्ण झाली नसल्यामुळेच अशा दुर्घटना वारंवार घडत असल्याचा आरोप करत त्यांनी महापौरांवरही निशाणा साधला. “मुंबईच्या महापौरांना मुंबईकरांची नाही, फक्त बांग्लादेशींची काळजी आहे,” अशी जहरी टीका त्यांनी केली. सविस्तर वाचा…



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.