Headlines

मुंबईत मुसळधार पावसाचा कहर:अनेक ठिकाणी कंबरेएवढे पाणी, कुठे झाडे कोसळली; फोटो-व्हिडिओमधून पाहा मुंबईची तुंबई झालेली अवस्था




मुंबईकरांची सकाळ पुन्हा एकदा मुसळधार पावसाने झाली आहे. सलग कोसळणाऱ्या पावसामुळे मुंबई आणि उपनगरांतील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. दादर, हिंदमाता, सायन, कुर्ला आणि अंधेरी सबवेसह अनेक सखल भागांमध्ये कंबरेएवढे पाणी साचल्याने वाहतुकीचा पुरता बोजवारा उडाला आहे. तर, सोसाट्याच्या वाऱ्यामुळे शहरात ठिकठिकाणी झाडे कोसळल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. कामावर निघालेल्या चाकरमान्यांना पाण्यातून वाट काढताना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत असून, रस्ते वाहतुकीसह लोकल सेवेवरही या पावसाचा मोठा परिणाम झाला आहे. प्रशासनाच्या दाव्यांची पोलखोल करत, अवघ्या काही तासांच्या पावसात मुंबईची पुन्हा एकदा ‘तुंबई’ झाल्याचे चित्र आहे. मुंबईतील पावसाचा कहर, साचलेले पाणी आणि नागरिकांचे हाल दर्शवणारे हे 20 खास फोटो पुढे पाहा… भिवंडीमधील बाजारपेठांमध्ये गर्दी, दुकानदार आपला माल घेऊन सुरक्षित ठिकाणी जात आहे माटुंगा: पावसामुळे झाडे कोसळली, अनेक वाहनांचे नुकसान झाले भिवंडी येथे रस्त्यावर उभी असलेली वाहने पाण्यात बुडाली पावसाच्या सरींनी मरीन ड्राइव्हचा नजारा खुलला, 4 फोटोज..
मुंबईत मान्सूनचा जोर कायम असून शनिवारीही शहरात अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत आहेत. मरीन ड्राइव्ह परिसरातही रिमझिम पावसामुळे आल्हाददायक वातावरण निर्माण झाले असून, समुद्रकिनाऱ्यावर पावसाचा आनंद लुटण्यासाठी नागरिकांची उपस्थिती दिसून येत आहे. दरम्यान, हवामान विभागाने मुंबईत पुढील काही तासांतही पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली असून नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. नवी मुंबईतील भाजी बाजारात पाणी साचले वसई-विरारमधील घरांमध्ये शिरले पाणी, रस्ते पाण्याखाली अंधेरी सबवेमध्ये पाणी शिरल्याने बंद शिवाजी पार्कवर तरुणांचा ‘रेन क्रिकेट’चा थरार
मुंबईत मुसळधार पावसाचा जोर कायम असतानाही क्रिकेटप्रेमींचा उत्साह कमी झालेला नाही. दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये तरुण क्रिकेटपटूंनी मुसळधार पावसातच क्रिकेटचा आनंद लुटला. वांद्रे पश्चिमेतील रस्ते जलमय
वांद्रे पश्चिमेतील रस्त्यांवरही मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. जलसाचल्यामुळे वाहनचालक आणि पादचाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून, काही ठिकाणी वाहतुकीचाही वेग मंदावला आहे. भिवंडी जलमय! मुसळधार पावसाने सखल भाग पाण्याखाली
ठाणे जिल्ह्यात पहाटेपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भिवंडी शहरातील अनेक सखल भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. रस्ते जलमय झाल्याने नागरिकांची दैनंदिन वाहतूक विस्कळीत झाली असून वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. संबंधित बातम्या वाचा.. राज्यात आडवातिडवा पाऊस:मुंबईत सलग चौथ्या दिवशी मुसळधार, कोकणात रेड अलर्ट; विदर्भातही पावसाचा जोर राज्यभरात पावसाचा जोर कमालीचा वाढला असून आज (४ जुलै) देखील बहुतांश ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा कडक इशारा देण्यात आला आहे. जून महिना पूर्णपणे कोरडा गेल्यानंतर जुलैच्या पहिल्याच आठवड्यात वरुणराजाने धडाकेबाज बॅटिंग सुरू केल्याने बळीराजा सुखावला आहे, मात्र नागरी भागात जनजीवन विस्कळीत झाले आहे. हवामान खात्याने मुंबई शहरासह ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या किनारपट्टीच्या जिल्ह्यांमध्ये ४ ते ६ जुलै दरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई, नवी मुंबई, ठाणे, भिवंडी, पालघर आणि कल्याण-डोंबिवलीमधील शाळांना प्रशासनाने तातडीने सुट्टी जाहीर केली आहे. गुजरातमध्ये पूर, 19 जणांचे रेस्क्यू: महाराष्ट्रातही सर्वदूर पाऊस, पालघरमध्ये शाळा – कॉलेज बंद; उज्जैनमध्ये युवक वाहून गेला मान्सून देशातील जवळपास सर्व राज्यांमध्ये पोहोचला आहे. पण गुजरात – महाराष्ट्राचे काही भाग याला अपवाद आहेत. तत्पूर्वी या दोन्ही राज्यांमध्ये पावसामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. गुजरातच्या मेंडरडा परिसरात समधियाळा गावाजवळ पुराच्या पाण्यात चार गाड्या अडकल्या. त्यात अडकलेल्या 19 जणांना वाचवण्यात यश आले आहे. तिकडे महाराष्ट्रातील नालासोपारा येथे रेल्वे स्टेशनबाहेर गुडघ्यापर्यंत पाणी साचले. प्रवाशांना पाण्यातून वाट काढत स्टेशनवर पोहोचावे लागत आहे. पालघरमध्ये पावसामुळे शाळा-महाविद्यालये बंद करण्यात आली आहेत. सविस्तर वाचा पर्यटकांची प्रतीक्षा संपली: लोणावळ्यातील भुशी धरण अखेर ओव्हरफ्लो; पायऱ्यांवरून वाहू लागले शुभ्र पाण्याचे प्रवाह पर्यटकांचे हक्काचे ठिकाण आणि पावसाळ्यातील प्रमुख आकर्षण असलेल्या लोणावळ्यातील प्रसिद्ध ‘भुशी धरण’ आज सकाळी अखेर ओव्हरफ्लो झाले आहे. गेल्या ४८ तासांत लोणावळा-खंडाळा परिसरात झालेल्या तब्बल २२९ मिमी मुसळधार पावसामुळे धरणाचा सांडवा पूर्णपणे भरून वाहू लागला आहे. शुभ्र फेसाळणारे पाण्याचे प्रवाह पायऱ्यांवरून वाहू लागल्याने पर्यटकांमध्ये आनंदाचे उधाण आले असून, लोणावळ्यातील वर्षा पर्यटनाला आता खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *