Headlines

Nagpur: Bavankule Slams Uddhav Thackeray On Hindutva


अयोध्येतील राम मंदिराच्या बांधकामातील कथित अनियमितता आणि दानपेट्यांच्या चोरीच्या मुद्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पाच तारखेला राज्यभरात ‘घंटानाद’ आणि ‘रामरक्षा आंदोलन’ करण्याची घोषणा केली आहे. त्यांच्या या घोषणे

.

उद्धव ठाकरेंना चांगली बुद्धी सुचली, आता ती टिकवावी

उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर टीका करताना बावनकुळे म्हणाले, “जेव्हा संपूर्ण देश आणि राज्याचा आग्रह होता की उद्धव ठाकरेंनी अयोध्येला जावे, तेव्हा त्यांनी तिकडे बघणेही टाळले. काँग्रेसच्या नेत्यांना वाईट वाटेल आणि आपली काँग्रेस-राष्ट्रवादीसोबतची अभद्र युती बिघडेल, या भीतीने त्यांनी प्रभू रामचंद्राशी फारकत घेतली होती. मतांच्या लांगूलचालनासाठी त्यांनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचे विचारही सोडले.”

“आता पक्षातील खासदार, आमदार आणि हिंदुत्ववादी कार्यकर्ते सोडून जात असल्यामुळे केवळ त्यांचा रोष कमी करण्यासाठी आणि राजकीय फायद्यासाठी ठाकरेंनी हे आंदोलन पुकारले आहे. नवनीत राणा यांनी हनुमान चालिसा पठण केले तेव्हा त्यांना 14 दिवस तुरुंगात टाकणाऱ्या ठाकरेंना आता रामाची आठवण आली आहे. उशिरा का होईना त्यांना चांगली बुद्धी सुचली आहे, आता ती त्यांनी काही काळ तरी टिकवून ठेवावी, नाहीतर ते पुन्हा काँग्रेसच्याच मार्गावर जातील.”

अमित साटम यांची पाठराखण

साकीनाका मॅनहोल दुर्घटनेवर भाजप आमदार अमित साटम हसल्याच्या प्रकरणावर आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केलेल्या टीकेवर बावनकुळे यांनी साटम यांची पाठराखण केली. “अमित साटम हे अत्यंत प्रगल्भ आणि संवेदनशील नेते आहेत. ते कधीही एवढ्या मोठ्या घटनेवर हसणार नाहीत किंवा असे हावभाव करणार नाहीत. बोलताना अनेक विषय येतात, त्यामुळे संदर्भाची गल्लत झाली असावी. त्यांच्या बोलण्याचा विपर्यास केला जात असून, लोकांनी हा गैरसमज दूर करावा,” असे बावनकुळे म्हणाले.

महसूल व आरटीओ (RTO) मधील गैरव्यवहार

नागपूर ग्रामीण आरटीओमध्ये अरुणाचल प्रदेश, नागालँड आणि लक्षद्वीपमधून अवैध पद्धतीने 2000 ट्रक रजिस्टर झाल्याच्या प्रकरणावर त्यांनी चिंता व्यक्त केली. “याबाबत मलाही काही कुणकुण लागली होती. परिवहन मंत्री म्हणून प्रताप सरनाईक यांनी यावर योग्य ती कारवाई सुरू केली असून, रेती माफिया आणि चोरीच्या वाहनांचा वापर करणाऱ्यांना पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत,” असे ते म्हणाले.

जयंत पाटलांच्या टीकेला प्रत्युत्तर

मुंबई महापालिकेच्या (BMC) निधीत घट झाल्याच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्या आरोपांवरही त्यांनी भाष्य केले. “जयंत पाटलांनी असे बोलणे हास्यास्पद आहे. त्यांनी आधी उद्धव ठाकरेंच्या सरकारच्या काळात काय काय झाले ते तपासून पाहावे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालिकेतील पैशांच्या ठेवी बँकेत पडून ठेवण्यापेक्षा तो पैसा मुंबईच्या विकासासाठी आणि पायाभूत सुविधांसाठी वापरण्याची योग्य भूमिका घेतली आहे,” असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

प्रशासकीय बदल्या आणि एकनाथ शिंदेंची प्रकृती

12 वर्षांनंतर जिल्हाधिकारी, अप्पर जिल्हाधिकारी आणि निवासी उपजिल्हाधिकारी (RDC) यांच्या कामांच्या आणि जबाबदाऱ्यांच्या विभाजनाचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे प्रशासनाला अधिक गती मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती गेल्या ३-४ दिवसांपासून ठीक नव्हती. मात्र, आता त्यांना बरे वाटत असून सोमवार किंवा मंगळवारी ते पुन्हा विधिमंडळाच्या कामकाजात सहभागी होतील, अशी माहितीही त्यांनी दिली.

दरम्यान, समृद्धी किंवा पुणे एक्स्प्रेसवेवरील खड्ड्यांबाबत बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, ‘डिफेक्ट लायबिलिटी पिरियड’अंतर्गत या खड्ड्यांच्या दुरुस्तीचा संपूर्ण खर्च संबंधित कंत्राटदाराला करावा लागतो, यासाठी सरकारला एकही पैसा खर्च करावा लागत नाही.

हेही वाचा…

‘उबाठा’चे रामरक्षा आंदोलन म्हणजे निव्वळ राजकीय नौटंकी:काँग्रेसच्या दबावामुळे उद्धव ठाकरेंनी अयोध्येतील ऐतिहासिक सोहळा टाळला; भाजपचा गंभीर आरोप

मुंबईत हनुमान चालीसा पठण करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली, त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आणि खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांना तुरुंगात जावे लागले, हे महाराष्ट्र विसरलेला नाही, असे म्हणत उद्धव ठाकरे यांच्या रामरक्षा आंदोलनावर भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी टीका केली आहे. ज्यांनी हनुमान चालीसा पठणालाही विरोध केला, ते आज रामरक्षेच्या नावाने आंदोलन करत आहेत. त्यामुळे हे आंदोलन श्रद्धेचे नसून राजकीय अस्तित्व टिकविण्याचा प्रयत्न आहे. उबाठाने हिंदुत्वाचा आव आणण्यापेक्षा आपल्या भूमिकेचे आत्मपरीक्षण करावे. येथे वाचा संपूर्ण बातमी

राम मंदिराच्या देणग्या लुटणाऱ्यांना प्रभू श्रीराम सोडणार नाहीत:यात मोदींपासून भागवतांपर्यंत सगळेच सामील, नाना पटोलेंचा भाजप- RSS वर गंभीर आरोप

अयोध्येतील राम मंदिर निर्मितीसाठी गोळा करण्यात आलेल्या देणग्यांमध्ये मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत, काँग्रेसन नेते नाना पटोले यांनी भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर थेट आणि गंभीर आरोप केले आहेत. या घोटाळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून ते सरसंघचालक मोहन भागवत यांच्यापर्यंत सर्वच जण सामील असल्याचा दावा पटोले यांनी नागपुरात बोलताना केला. तसेच, केवळ अयोध्येतच नाही, तर पंढरपूर आणि सिद्धिविनायक मंदिराच्या देणग्यांमध्येही लूट झाल्याचे ते म्हणाले. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.