Headlines

टाळ-मृदंगाचा गजर अन् माऊलींचा जयघोष:संत मुक्ताईंची पालखी जालन्यात दाखल; रविवारी रंगणार भव्य रिंगण सोहळा




‘आदीशक्ती मुक्ताईंचा जयघोष, टाळ-मृदंगाचा गजर आणि विठू माऊलीच्या दर्शनाची आस…’ अशा अत्यंत भक्तीमय वातावरणात पंढरपूरकडे निघालेली संत मुक्ताईंची पालखी शनिवारी जालना जिल्ह्यात दाखल झाली. रिमझिम कोसळणारा पाऊस आणि त्यात ओसंडून वाहणारा वारकऱ्यांचा उत्साह, यामुळे संपूर्ण जालना जिल्हा विठ्ठलमय झाला आहे. वाघरूळ सीमेवर प्रशासनाकडून स्वागत जिल्हा प्रशासनाच्या वतीने बुलडाणा आणि जालना जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या वाघरुळ येथे या पालखीचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी उपविभागीय अधिकारी रामदास दौंड, तहसीलदार छाया पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी, आणि नायब तहसीलदार राजू निहाळ यांच्यासह महसूल आणि पोलीस प्रशासनातील अनेक अधिकारी उपस्थित होते. तसेच, माजी राज्यमंत्री तथा आमदार अर्जुन खोतकर यांनीही पालखीत सहभागी होत माऊलींचे दर्शन घेतले. रिमझिम पावसातही वारकऱ्यांचा उत्साह कायम पालखी जिल्ह्यात दाखल होत असताना रिमझिम पावसाच्या सरी कोसळत होत्या. यामुळे वातावरणात छान गारवा निर्माण झाला होता. मात्र, या पावसाची तमा न बाळगता वारकरी आणि स्थानिक ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून हरिनामाचा गजर केला. माऊलींच्या स्वागतासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. रविवारी जेईएस मैदानावर भव्य रिंगण सोहळा वारकरी आणि जालनेकरांसाठी सर्वात उत्सुकतेचा क्षण म्हणजे पालखीचा ‘रिंगण सोहळा’. उद्या (रविवारी) सकाळी ठीक ७:३० वाजता शहरातील जेईएस महाविद्यालयाच्या मैदानावर हा नयनरम्य रिंगण सोहळा संपन्न होणार आहे. या सोहळ्यासाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली असून, हा सोहळा ‘याचि देही, याचि डोळा’ अनुभवण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळण्याची शक्यता आहे. हेही वाचा.. विठ्ठल मंदिरातील मूर्तींची आजपासून प्राणप्रतिष्ठा: जतन व संवर्धन विकास आराखड्यानुसार कामे, औसेकर महाराज म्हणाले, वारकऱ्यांना यंदा सुखद अनुभूती
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर व परिवार देवता मंदिर जतन व संवर्धन विकास आराखड्यांतर्गत जीर्णोद्धार व संवर्धनाची कामे पूर्ण झालेल्या श्री व्यंकटेश मंदिर, श्री महालक्ष्मी मंदिर, श्री काशी अन्नपूर्णा मंदिर तसेच कचेरीजवळील श्री मारुती मंदिर येथील मूर्तींची प्राणप्रतिष्ठा ४ व ५ जुलै रोजी विधीपूर्वक संपन्न होणार आहे. मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले की, एअर अम्ब्रेशन, लाइम पॉइटिंग नवीन दगडी फ्लोअरिंग तसेच संरक्षक कोटिंगची कामे पूर्ण केल्याने भाविकांसाठी सुखद अनुभूती मिळणार आहे. या संवर्धन कामांमुळे मंदिरांचा ऐतिहासिक वारसा जपत त्यांचे मूळ स्वरूप पुनर्स्थापित केले आहे. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *