Headlines

नरसिंग महाराज मंदिरासमोर साचले पाणी‎:अकाेटच्या ग्रामदैवताकडे दुर्लक्ष; पटांगणाच्या निकृष्ट कामामुळे परिसराला तलावाचे स्वरूप‎



अकोट नगरीचे आराध्य व ग्रामदैवत श्री संत नरसिंग महाराज मंदिराचे सौंदर्य आणि पावित्र्य नेहमीच भाविकांना आकर्षित करत आले. मात्र, सध्या कंत्राटदाराचा बेजबाबदारपणा व नगरपरिषदेच्या नियोजनशून्य कारभारामुळे पवित्र परिसराची दुरवस्था झाली आहे. पावसामुळे मंदिरा

.

मंदिरासमोरील पटांगणाचे काम पूर्ण झाल्यावर कंत्राटदाराने योग्य उतार दिला नाही. तसेच पाणी निचऱ्याची कोणतीही कायमस्वरूपी व्यवस्था केली नाही. परिणामी, प्रत्येक पावसानंतर संपूर्ण परिसराला तलावाचे स्वरूप येत आहे. साचलेले हे पाणी केवळ पावसाचे नसून, त्यात शेजारील गटारीचे पाणी मिसळत असल्याने संपूर्ण भागात असह्य दुर्गंधी पसरली आहे. यामुळे परिसरात डेंग्यू, मलेरियासारख्या आजारांना कारणीभूत ठरणाऱ्या डासांची उत्पत्ती वाढत असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

पाणी निचऱ्याची व्यवस्था करावी ^दरवर्षी पावसाळ्यात हीच परिस्थिती निर्माण होते. नगरपरिषद आणि संबंधित कंत्राटदाराने केवळ थातूरमातूर कामे न करता येथील पाणी निचऱ्याची कायमस्वरूपी व्यवस्था करावी, तरच नागरिकांना आणि भाविकांना खरा दिलासा मिळेल. – डॉ. सुहास कुलट, स्थानिक रहिवासी.

कंत्राटदारावर कारवाई करावी, ग्रामस्थ आक्रमक ^अकोटची ओळख असलेल्या ग्रामदैवताच्या मंदिरात दर्शनासाठी येताना गटारीच्या पाण्यातून जावे लागते, ही शहरासाठी अत्यंत लाजिरवाणी बाब आहे. प्रशासनाने तातडीने कंत्राटदाराची चौकशी करून त्याच्यावर कारवाई करावी. तसेच हा रस्ता तत्काळ दुरुस्त करावा. – रमेश मराठे, भाविक.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *