![]()
महिनाभर प्रतीक्षा लावलेल्या पावसाने शहरात हजेरी लावताच मालेगावातील अनेक नागरी वसाहतींमधील मूलभूत सुविधांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. भुयारी गटारांची रखडलेली कामे, खोदून ठेवलेले रस्ते आणि अपुऱ्या जलनिस्सारण व्यवस्थेमुळे अनेक भागांत चिखल व साचलेल्या पाण्याचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे महिला, ज्येष्ठ नागरिक, शालेय विद्यार्थी आणि वाहनचालकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. प्रभाग क्रमांक ३ मधील खातून बी.एड. कॉलेज रोड, अक्सा कॉलनी, नूरनगर आणि कुरेशी मशिद परिसरात भूमिगत गटारांसाठी खोदलेले रस्ते अद्याप पूर्ववत करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे रिमझिम पावसातही रस्ते चिखलमय झाले आहेत. गतवर्षी अशाच खड्ड्यात पडून दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला होता. तरीही संबंधित यंत्रणेकडून कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आलेली नसल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मोसम पूल, कॅम्प रोड, सटाणा रोड, गवळीवाडा, पंचशीलनगर, श्रीकृष्णनगर तसेच प्रभाग क्रमांक १२ मध्येही पाणी साचत असून नाल्यांची साफसफाई न झाल्याने दुर्गंधी वाढली आहे. रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतुकीत अडथळे निर्माण होत असून डेंग्यू, मलेरिया यांसारख्या साथीच्या आजारांचा धोका वाढला आहे. तातडीने पाण्याचा निचरा करून रखडलेली रस्त्यांची कामे पूर्ण करावीत, अशी मागणी नागरिकांनी महानगरपालिकेकडे केली आहे. मोठे नाले व गटारींची नियमित साफसफाई होत नसल्याने पाण्याचा प्रवाह अडतो आणि गाळ व कचरा रस्त्यावर येतो. त्यामुळे दुर्गंधी वाढून डेंग्यू, मलेरिया यांसारख्या साथीच्या आजारांचा धोका निर्माण झाला आहे. शहराच्या वाढत्या विस्तारानुसार जलनिस्सारण व्यवस्था व इतर मूलभूत सुविधा तातडीने उभारण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने उपाययोजना करून रखडलेली विकासकामे पूर्ण करावीत, अशी मागणी नागरिकांनी पुन्हा एकदा केली आहे. शहराचे विस्तारीकरण झाले; सुविधा मात्र त्याच जागी गेल्या काही वर्षांत मालेगाव शहराचा झपाट्याने विस्तार झाला असून शहरालगत अनेक नवीन नागरी वसाहती उभ्या राहिल्या आहेत. मात्र, त्या तुलनेत रस्ते, गटारी आणि पावसाच्या पाण्याच्या निचऱ्याची व्यवस्था विकसित झालेली नाही. परिणामी, पावसाळ्यात रस्त्यांवर पाणी साचून चिखलाचे साम्राज्य निर्माण होत आहे.
Source link
मालेगावात रखडलेल्या गटार कामांमुळे रस्त्यांवर चिखल आणि पाण्याचे डबके:रखडलेली विकासकामे पूर्ण करून पाण्याचा निचरा करण्याची नागरिकांची मागणी