![]()
श्री स्वामी समर्थ पालखी परिक्रमेअंतर्गत महाराजांच्या पावन पादुकांचे अकलूज येथे शनिवारी सायंकाळी भक्तिमय वातावरणात आणि वाद्यांच्या गजरात उत्साहपूर्ण स्वागत करण्यात आले. भाविकांच्या मोठ्या उपस्थितीत विठ्ठल मंदिर परिसर भक्तिरसाने ओथंबून गेला. संपूर्ण महाराष्ट्राची परिक्रमा करून अखेरीस अक्कलकोट येथे पोहोचणारा हा पालखी सोहळा तब्बल नऊ महिन्यांचा असून, दरवर्षीप्रमाणे यंदाही अकलूज येथे दाखल झाला. लवंग (पंचवीस चार) येथील पाहुणचार स्वीकार ्यानंतर पालखी सोहळ्याचे विठ्ठल मंदिरात आगमन झाले. गेल्या २९ वर्षांपासून या पालखी सोहळ्याचा मुक्काम अकलूज येथील विठ्ठल मंदिरात होत असून, श्रींच्या आरतीचा मान माने-पाटील कुटुंबीयांकडे आहे. त्यानुसार सायंकाळी शर्मिलादेवी माने-पाटील व किशोरसिंह माने-पाटील यांच्या हस्ते श्रींची महाआरती संपन्न झाली. त्यानंतर पालखी सोहळा मुक्कामासाठी मंदिरात स्थिरावला. रात्री उशिरापर्यंत भाविकांनी श्रींच्या पावन पादुकांचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती. अकलूजक ांच्या वतीने पालखीसोबत आलेल्या सेवेकरी व भाविकांसाठी भोजनाचीही उत्तम व्यवस्था करण्यात आली. रविवारी (५ जुलै) पहाटे श्रींच्या पादुकांना युगंधरा माने-पाटील व क्रांतीसिंह माने-पाटील यांच्या हस्ते अभिषेक व पाद्यपूजन करण्यात आले. यावेळी विविध धार्मिक विधी पार पडले. त्यानंतर अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली. सकाळी अकलूजकरांचा निरोप घेत पालखी सोहळा यशवंतनगर येथील शिवरत्न बंगल्यावर पूजेसाठी आला. अकलूमधील या पालखी सोहळ्याने संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला होता. भाविकांनी श्री स्वामी समर्थांच्या जयघोषात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. तेथील धार्मिक कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर सोहळ्याने पुढील प्रवासासाठी बागेची व ाडीकडे प्रस्थान केले. यावेळी अकलूज येथील श्री स्वामी समर्थ पालखी परिक्रमा सेवेकरी पालखीसोबत उपस्थित होते.
शहरात दरवर्षी आषाढीला संत तुकाराम महाराज, संत सोपानकाका, संत गोरोबा कुंभार आदी संताच्या पालखी सोहळ्याची परंपरा आहे. अकलूजकर नेहमीच या सोहळ्यातील भाविकांची आतुरतेने वाट बघत असतात, त्यांची सेवा करण्यात त्यांना धन्यता वाटते. याशिवाय अकलूजमध्ये आणखी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. ^ अकलूज शहरात २९ वर्षांपासून श्री स्वामी समर्थ यांच्या पालखीची जपली जाते परंपरा अकलूजमध्ये गेली २९ वर्षांपासून श्री स्वामी समर्थांच्या परिक्रमेतील पालखी सोहळा विठ्ठल मंदिरात मुक्कामी येण्याची परंपरा आहे. येथे स्वामी समर्थांचा भक्तवर्ग ही मोठा आहे. स्वामींची आरती,अभिषेक व पाद्यपूजा करण्याचा मान माने-पाटील कुटुंबीयांकडे आहे. या सोहळ्यामुळे त्यातील भाविकांची ही सेवा करण्याची आम्हा अकलूजकरांना संधी मिळाली आहे. – त्रिंबक गुळवे, भाविक, अकलूज
Source link
अकलूजमध्ये श्री स्वामी समर्थ पालखी सोहळ्याचे भक्तिमय वातावणात स्वागत:अभिषेक, पाद्यपूजनासह विविध कार्यक्रम उत्साहात