Headlines

बदलाची बातमी:देशातील 9 राज्यांत 42 हजार वृद्धांचे नेटवर्क तयार; एकमेकांना मदत करून 70% वृद्ध स्वावलंबी, अनेक लखपती, एकटेपणाही दूर झाला


  • Marathi News
  • National
  • Network Of 42 Thousand Elderly People Created In 9 States Of The Country; 70% Of The Elderly Are Self reliant By Helping Each Other, Many Are Millionaires, Loneliness Is Also Eliminated

गिरीश मिश्रा, मिशन हेड, लाइव्हलीहूड अँड रेझिलिअन्स, हेल्पएज इंडिया2 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक
गटाशी जोडलेले वृद्ध अनेक कामे एकत्र मिळून करतात. - Divya Marathi

गटाशी जोडलेले वृद्ध अनेक कामे एकत्र मिळून करतात.

बिहारच्या सुपौल जिल्ह्यातील ७५ वर्षीय मोहन मंडल गावात वृद्धांच्या एका गटाचा भाग आहेत. यात समवयस्क सहकारी एकमेकांची काळजी घेतात व सरकारी योजनांशी जोडण्यासाठी मदत करतात. मोहन यांनाही एका सहकाऱ्याने ‘वय वंदना कार्ड’ बनवण्यासाठी प्रेरित केले. त्यावेळी त्यांना हे कार्ड कधीतरी आपला जीव वाचवेल, अशी कल्पनाही नव्हती. काही दिवसांनंतरच मोहन यांना ब्रेन स्ट्रोक आला. उपचाराचा खर्च लाखो रुपये होता. मग गावच्या ग्रुपने कुटुंबाला योजनेत समाविष्ट रुग्णालयापर्यंत पोहोचवले. तिथे त्यांची शस्त्रक्रिया झाली. तीन लाख खर्च झाले. आज मोहन निरोगी आहेत. आता इतर वृद्धांनाही गरजेच्या खर्चासाठी तयार राहण्यास प्रेरित करतात. यूएन पॉप्युलेशन अवॉर्डने सन्मानित हेल्पएज इंडियाने त्सुनामीनंतर अशा गटांचा पाया रचला होता. आज मोहन यांच्यासारखे ४२ हजार वृद्ध देशभरातील ९ राज्यांतील ३ हजार ग्रुप्सशी जोडले गेले आहेत.

एकमेकांच्या मदतीचे व्यासपीठ म्हणून सुरू झाला होता ग्रुप

वर्ष २००४ मधील त्सुनामीने प्रभावित वृद्धांसाठी २००५ मध्ये चेन्नईत पहिला एल्डर सेल्फ हेल्प ग्रुप बनला. त्यानंतर देशभरात सुरू करण्यात आला. एका ग्रुपमध्ये ५५ वर्षे किंवा अधिक वयाचे १०-२० वृद्ध असतात. संस्था गावांमध्ये जाऊन अशा लोकांची ओळख पटवते. ते आर्थिक, सामाजिक किंवा आरोग्याशी संबंधित अडचणींचा सामना करतात. सदस्य नियमित बैठक घेतात.बचत करतात. एकमेकांना कर्ज देतात आणि स्थानिक समस्यांवर एकत्र मिळून काम करतात. या ग्रुप्सचे ७०% वृद्ध पूर्णपणे स्वावलंबी झाले आहेत.

गटातील प्रत्येक वृद्धाकडे १.१९ लाख रु. जमा झाले सुपौलमध्ये वृद्ध दरमहा प्रत्येकी ५० रुपये जमा करतात. १५ वर्षांत गटाने आपल्या सदस्यांना २.३३ कोटी रुपयांचे कर्ज दिले आहे. यातून १३ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. आता ग्रुपच्या प्रत्येक सदस्याचा वाटा १.१९ लाख रुपये आहे. लोक त्यांना लखपती वृद्ध म्हणतात. भारत सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयानेही एल्डर सेल्फ हेल्प ग्रुप मॉडेल स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. याला राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियानात समाविष्ट केले आहे.

(शब्दांकन : राजेश)



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *