मुंबई, पुण्यासह संपूर्ण घाटमाथ्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले असून याचा थेट फटका रेल्वे वाहतुकीला बसला आहे. कर्जत-लोणावळा दरम्यान असलेल्या घाट सेक्शनमधील ठाकूरवाडी आणि मंकी हिल दरम्यान आज अचानक मोठी दरड कोसळली. रेल्वे ट्रॅकवर प्रचंड प्रमाणात माती
.
रेल्वे ट्रॅकवरील दरड आणि मातीचा ढिगारा हटवण्यासाठी रेल्वे प्रशासनाने तात्काळ कामगारांची टीम आणि यंत्रसामग्री घटनास्थळी रवाना केली आहे. मात्र, घाट परिसरात सतत सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे आणि चिखलामुळे दुरुस्तीच्या कामात मोठे अडथळे येत आहेत. मार्ग कधी पूर्ववत होणार याबाबत निश्चित वेळ सांगता येत नसल्याने, रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना आपल्या गाडीचे लाइव्ह स्टेटस (Live Status) तपासूनच घराबाहेर पडण्याचे आवाहन केले आहे.

रद्द करण्यात आलेल्या प्रमुख रेल्वे गाड्या
प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मध्य रेल्वेने अप (Up) आणि डाऊन (Down) दोन्ही मार्गांवरील खालील गाड्या आजसाठी पूर्णपणे रद्द केल्या आहेत:
- १२१२३ / १२१२४ : मुंबई (CSMT) – पुणे – मुंबई डेक्कन क्वीन
- ११००९ / ११०१० : मुंबई (CSMT) – पुणे – मुंबई सिंहगड एक्स्प्रेस
- २२१०५ / २२१०६ : मुंबई (CSMT) – पुणे – मुंबई इंद्रायणी एक्स्प्रेस
- १२१२७ / १२१२८ : मुंबई (CSMT) – पुणे – मुंबई इंटरसिटी एक्स्प्रेस
- ११००७ / ११००८ : मुंबई (CSMT) – पुणे – मुंबई डेक्कन एक्स्प्रेस
- १२१२५ / १२१२Container६ : मुंबई (CSMT) – पुणे – मुंबई प्रगती एक्स्प्रेस
- १२१६९ / १२१७० : पुणे – सोलापूर – पुणे इंटरसिटी एक्स्प्रेस
- ११०११ / ११०१२ : मुंबई (CSMT) – धुळे – मुंबई एक्स्प्रेस
दरम्यान, काही गाड्यांचे मार्ग वळवण्यात आले असून, रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटवर त्याची अद्ययावत माहिती उपलब्ध आहे.


मुंबई-पुण्यात पावसाचा रेड अलर्ट; सखल भागात साचले पाणी
हवामान विभागाने मुंबई आणि पुणे जिल्ह्यासाठी अतिवृष्टीचा इशारा जारी केला आहे. सोमवारी पहाटेपासूनच मुंबईच्या मध्य, पश्चिम उपनगरांसह दक्षिण मुंबईतील सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे रस्त्यावरील वाहतूक अत्यंत संथ गतीने सुरू आहे.
केवळ रेल्वेच नाही, तर मुसळधार पावसामुळे मुंबई-पुणे एक्सप्रेसवे आणि जुन्या हायवेवरही वाहतुकीची कोंडी झाली आहे. ऐन आठवड्याच्या सुरुवातीलाच (सोमवारी) हा प्रकार घडल्याने हजारो नोकरदार आणि चाकरमान्यांचे अतोनात हाल होत असून अनेकांचा प्रवास अर्ध्यातच अडकला आहे.
दरम्यान, नागरिकांनी सतर्कता बाळगून गरज असल्याशिवाय मुंबई – पुणे दरम्यान प्रवास करू नये असे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. ते म्हणाले, “मुंबई आणि पुण्यात सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पुणे – मुंबई मिसिंग लिंकवरील पुण्याहून मुंबईकडे येणाऱ्या मार्गावर दरड कोसळल्याची घटना घडली आहे. त्यामुळे पुणे – मुंबई द्रुतगती मार्गावरील वाहतूक आज पहाटे ४ वाजल्यापासून वळवण्यात आली आहे. सध्या रस्त्यावर पडलेली दरड दूर करून हा मार्ग पुन्हा सुरू करण्याचे शर्थीचे प्रयत्न एमएसआरडीसी आणि हायवे पोलिसांकडून सुरू आहेत. मात्र सातत्याने कोसळणारा पाऊस आणि सोसाट्याचा वारा यामुळे यात काही अडचणी येत आहेत. यासोबतच मुंबई – पुणे रेल्वे मार्गावर ठाकूरवाडी येथे दरड कोसळल्याची घटना घडल्याने मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या काही रेल्वे गाड्या रेल्वे प्रशासनाने रद्द केल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी सतर्कता बाळगून गरज असल्याशिवाय मुंबई – पुणे दरम्यान प्रवास करू नये असे आवाहन मी आपल्याला करतो.”

हे ही वाचा…
मावळच्या पाटण गावात घरावर कोसळली दरड:कुटुंब ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती; मिसिंग लिंकचा स्लॅब कोसळला, मुंबई-पुणे प्रवास पूर्णपणे ठप्प
पुणे जिल्ह्याला मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले असून, सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे आता दुर्घटनांचे सत्र सुरू झाले आहे. आज (६ जुलै) पहाटेच्या सुमारास मावळ तालुक्यातील पाटण गावात एका घरावर डोंगरकड्यावरून मोठी दरड कोसळल्याची घटना घडली आहे. या ढिगाऱ्याखाली संबंधित घरातील संपूर्ण कुटुंब अडकल्याची प्राथमिक भीती व्यक्त केली जात असून, घटनास्थळी बचावकार्याला युद्धपातळीवर सुरुवात झाली आहे. दुसरीकडे, पुणे-मुंबई महामार्गावरील मिसिंग लिंकवर एका बोगद्यामध्ये स्लॅब कोसळला. यामुळे मुंबई-पुणे प्रवास ठप्प झाला आहे. सविस्तर वाचा…