Headlines

लुडो जिंकला अन् तरुणाचा खून:हल्लेखोराने केले चाकूने वार




लुडोचा खेळ जिंकल्यानंतर आनंद व्यक्त करणाऱ्या तरुणाचा किरकोळ वादातून चाकूने वार करून खून केल्याची घटना शनिवारी ४ जुलैला रात्री सुमारे अकरा वाजता गर्ल्स हायस्कूल ते जिल्हाधिकारी कार्यालय मार्गावर घडली. या प्रकरणी गुन्हे शाखेने तीनही आरोपींना अटक केली. अटक केलेल्या आरोपींत गोलू ऊर्फ शेख इम्रान शेख महमूद (२८, रा. यास्मिननगर, ह. मु. यवतमाळ), शेख अमीन शेख जब्बार (३४, रा. राहुलनगर), शेख समीर शेख जुम्मन (२७, रा. अमरावती) यांचा समावेश आहे. तर मृत तरुणाचे नाव जाहीद हुसेन रिफाकत हुसेन (२८, रा. पाकीजा कॉलनी.) असे आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *