Headlines

आखाडा बाळापूर जवळ जुगार अड्डयावर छापा:19 जण ताब्यात, 13 मोबाईलसह 1.10 लाखांचा मुद्देमाल जप्त; पोलिस अन् स्थानिक गुन्हे शाखेची संयुक्त कारवाई




आखाडा बाळापूर शिवारातील सिंचन वसाहत मार्गावर एका हॉटेलच्या पाठीमागे सुरु असलेल्या जुगार अड्डयावर स्थानिक गु्न्हे शाखा व आखाडा बाळापूर पोलिसांच्या पथकाने सोमवारी ता. ६ छापा टाकला. यामध्ये १३ मोबाईलसह १.१० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून २० जणांवर सायंकाळी उशीरा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आखाडा बाळापूर शिवारात काही जण झन्नामन्ना जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पोलिस अधिक्षक श्रेणिक लोढा, गुन्हे शाखेचे निरीक्षक मोहन भोसले, आखाडा बाळापूरचे पोलिस निरीक्षक शरद मरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक बालाजी गोणारकर, जमादार हरिभाऊ गुंजकर, भुजंग कोकरे, गजानन राठोड, परमेश्‍वर सरकटे, शंकर हराळ, चव्हाण यांच्या पथकाने आज दुपारी छापा टाकला. यावेळी घटनास्थळी २० जण जुगार खेळत असल्याचे दिसून आले. पोलिसांनी पाहताच एक जण फरार झाला मात्र पोलिसांनी १९ जणांना ताब्यात घेतले. पोलिसांनी त्यांच्याकडून रोख रक्कम, जुगाराचे साहित्य, १३ मोबाईल असा १.१० लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी जमादार गुंजकर यांनी आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी शेख मुनीर, निखील बंडेवार, शेख सलमान, कैलास क्षिरसागर, सुनील पोटे, मजर शेख, शेख जाकेर, सुरेश भडंगे, राजेश पाटेकर, साजिद पठाण, गणेश पवार, ऋषीकेश उपरे, कपील सारेवार, अनिल काशीदे, अविनाश बोंढारे, हारुण सय्यद, भारत पाईकराव, भगवान बोंढारे, इरफान कुरेशी, शेख सलीम यांच्या विरुध्द गुन्हा दाखल केला आहे. शेख सलीम वगळता इतरांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या कारवाईमुळे आखाडा बाळापूर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *