Headlines

पंढरपूरच्या वारीत फाइव्ह-जी वॉकीटॉकी अन् ड्रोनची नजर:वारकऱ्यांची संख्या मोजण्यासाठी एआयची मदत, यात्रेत प्रत्येक हालचालीवर असेल नजर



आषाढी वारीच्या बंदोबस्तासाठी जिल्हा पोलिस दल सज्ज झाले असून यंदाची वारी अधिक सुरक्षित व तंत्रस्नेही करण्यावर प्रशासनाने भर दिला आहे. यंदा आषाढी यात्रेत होणाऱ्या लाखो भाविकांच्या गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच ‘फाइव्ह-जी व

.

सोहळ्यासाठी १५ लाखांहून अधिक वारकरी पंढरपुरात येतात. हाच अंदाज गृहीत धरून यंदाही पोलिसांची तयारी सुरू आहे. वारीमध्ये येणाऱ्या भाविकांची अचूक संख्या मोजण्यासाठी आणि सुरक्षेवर देखरेख ठेवण्यासाठी पहिल्यांदाच एआय तंत्रज्ञान आणि ड्रोन कॅमेऱ्यांची मदत घेतली जाणार आहे. संपूर्ण पंढरपूर क्षेत्रावर लक्ष ठेवण्यासाठी एक मध्यवर्ती एकात्मिक नियंत्रण कक्ष उभारण्यात येत असून कॅमेऱ्यांच्या माध्यमातून वारीतील गर्दीचा आणि संवेदनशील ठिकाणांचा आढावा घेण्यात येणार आहे.

गर्दीत पारंपरिक वॉकीटॉकीवरील संदेश अस्पष्ट

लाखो वारकऱ्यांच्या गर्दीत पारंपरिक वॉकीटॉकीवरून मिळणारे संदेश अनेकदा अस्पष्ट असतात. त्यामुळे संपर्क साधताना अडचणी येतात. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढत पोलिस यंदा थेट ५ जी वॉकीटॉकी यंत्रणा वापरणार आहे. अशा प्रकारची अत्याधुनिक यंत्रणा राबवणारे सोलापूर हे देशातील पहिलेच पोलिस दल ठरणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.

जिल्ह्यात अपघातांचे प्रमाण १० टक्क्यांनी घटवण्याचे लक्ष्य

सोलापूर जिल्ह्यातील रस्ते अपघातांचे सत्र रोखण्यासाठी पोलिसांनी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. अपघातांचे प्रमाण किमान १० टक्क्यांनी कमी करण्याच्या उद्देशाने जिल्ह्यातील विहिरी, धोकादायक व विना-कठड्यांचे पूल, खड्डे आणि रस्त्यांवरील धोकादायक वळणे यांचे विशेष सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. या सर्वेक्षणाचा अहवाल हाती येताच संबंधित विभागाच्या मदतीने अपघातप्रवण क्षेत्रांमध्ये तातडीने सुरक्षा उपाययोजना राबवल्या जातील, असे पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी सांगितले. यामुळे अपघाताचे प्रमाण कमी होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

वाहतूक नियोजनासाठी ‘क्यूआर कोड’

मागच्या वर्षी आषाढी सोहळा आटोपल्यानंतर पंढरपुरातून एकाच वेळी ६० हजारांहून अधिक वाहने आणि ६ हजार बसेस मार्गस्थ झाल्या होत्या. ज्यामुळे मोठी कोंडी झाली होती. यंदा ही वाहतूक कोंडी फोडण्यासाठी एकेरी वाहतूक मार्ग (वन-वे) आणि ट्रॅफिक डायव्हर्शनचे अचूक नियोजन केले आहे. बाहेरून येणाऱ्या वाहनधारकांना पार्किंगची जागा आणि बस स्टँड कुठे आहे, हे सहज समजण्यासाठी पोलिस दल एक विशेष माहितीपट प्रसारित करेल. याशिवाय ‘क्यूआर कोड’ आणि गुगल लिस्टिंगच्या मदतीने वाहनचालकांना त्यांच्या मोबाइलवरच थेट पार्किंग रूटची माहिती मिळेल, जेणेकरून वाहनचालक थेट गाडीपर्यंत विनाअडथळा पोहोचू शकतील. एकूणच यंदाच्या वर्षी वारीमध्ये हायटेक यंत्रणा असणार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *