Headlines

चंद्रपूर जिल्ह्यातील बरंडघाट परिसरात वाघाच्या हल्ल्यामध्ये शेतकऱ्याचा मृत्यू:जिल्ह्यात 23 वा बळी, वन विभागाच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह




चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील बरंडघाट परिसरात सोमवारी सकाळी वाघाच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. राजेंद्र तिमाजी भोयर (५०, रा. बरंडघाट) असे मृताचे नाव आहे. विशेष म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यात सुरू असलेल्या मानव-वन्यजीव संघर्षातील हा २३ वा बळी ठरल्याने वन विभागाच्या उपाययोजनांवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राजेंद्र भोयर हे विश्वनाथ भोयर यांच्यासोबत शेतीसाठी फाटे तोडण्याच्या कामानिमित्त जंगलात गेले होते. या वेळी दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर झडप घालत भीषण हल्ला केला. हल्ला इतका गंभीर होता की, राजेंद्र भोयर यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर वन विभागाचे अधिकारी, पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा व पुढील कार्यवाही सुरू केली आहे. या घटनेनंतर बरंडघाटसह आसपासच्या गावांत भीतीचे वातावरण पसरले आहे. जनावरे चारण्यासाठी जंगलात जाणाऱ्यांमध्ये दहशत जंगलालगत शेती करणारे शेतकरी, शेतमजूर, जनावरे चारण्यासाठी जंगल परिसरात जाणाऱ्या नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली असून अत्यावश्यक कामाशिवाय जंगलात जाणे टाळावे आणि सतर्कता बाळगावी, असे आवाहन वन विभागाकडून करण्यात येत आहे. संतप्त ग्रामस्थांनी वारंवार घडणाऱ्या वाघाच्या हल्ल्यांवर प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *