![]()
येथून संतश्रेष्ठ श्री संत एकनाथ महाराज यांच्या ४७१ व्या आषाढी वारी पालखी सोहळ्याचे मंगळवारी (७ जुलै) सायंकाळी श्रीक्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. या ऐतिहासिक सोहळ्याची तयारी पूर्ण झाल्याचे पालखी प्रमुख रघुनाथ महाराज पालखीवाले यांनी सांगितले. प्रशासनाच्या वतीने सर्व तयारी करण्यात आल्याचे नगराध्यक्ष विद्या भूषण कावसानकर, मुख्याधिकारी पल्लवी अंभोरे, पोलिस निरीक्षक महादेव गोमारे यांनी सांगितले. नाथ मंदिर परिसरात आज पहाटेपासूनच वारकरी मराठवाड्यासह इतर भागातून हजारोंच्या संख्येने दाखल होत आहेत. भाविक, दिंड्या, टाळ-मृदंगाचा निनाद, वीणेच्या सुरावटी आणि भगव्या पताकांच्या साक्षीने पालखी प्रस्थानाची आतुरतेने वाट पाहत आहेत. सूर्यास्तसमयी पारंपरिक धार्मिक विधीनंतर संत एकनाथ महाराजांची पालखी पंढरीच्या दिशेने मार्गस्थ होणार आहे. यंदाच्या पालखी सोहळ्याचे नियोजन अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने करण्यात आले आहे. ७ जुलै ते २४ जुलै या कालावधीत पालखी विविध गावांमधून मार्गक्रमण करीत श्रीक्षेत्र पंढरपूर येथे दाखल होणार आहे. विविध कार्यक्रम घेतले जाणार आहे.
Source link
संत एकनाथ महाराज पालखीचे आज प्रस्थान:471 व्या आषाढी वारीसाठी हजारो वारकरी सज्ज