![]()
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर खुलताबाद येथील श्री भद्रा मारुती पायी दिंडीने सलग ३९व्या वर्षी भक्तिभावाने पंढरपूरकडे प्रस्थान केले. गजानन महाराज बारगळ यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या दिंडीत शेकडो वारकरी सहभागी झाले. “ज्ञानोबा-तुकाराम” च्या जयघोषाने आणि टाळ-मृदंगाच्या गजराने परिसर भक्तिमय झाला. प्रस्थानापूर्वी श्री भद्रा मारुती मंदिरात विठ्ठल-रुक्मिणी व श्री हनुमानाची पूजा, आरती आणि हरिनाम कीर्तन करण्यात आले. त्यानंतर माजी उपनगराध्यक्ष भागीनाथ मरकड यांच्या निवासस्थानी वारकऱ्यांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. महाप्रसादानंतर दिंडी विठ्ठलनामाच्या गजरात पंढरपूरच्या दिशेने रवाना झाली. या वेळी श्री भद्रा मारुती संस्थानचे अध्यक्ष मिठ्ठू बारगळ, भाजप जिल्हाध्यक्ष संजय खंबाते, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक संदीप निकम, जिल्हा परिषद सदस्य विकास कापसे, प्रकाश चव्हाण, नगरसेवक सुरेश मरकड, योगेश बारगळ, उमेश आवारे, सचिन पवार यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि असंख्य वारकरी उपस्थित होते. “पायी वारी ही केवळ धार्मिक यात्रा नसून भक्ती, समर्पण, सामाजिक ऐक्य आणि संस्कृती जपणारी परंपरा आहे,” असे प्रतिपादन गजानन महाराज बारगळ यांनी केले.
Source link
सलग 39 व्या वर्षी भद्रा मारुती पायी दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान:गजानन महाराज बारगळ यांच्या नेतृत्वाखाली प्रवास