Headlines

Heavy Rain Cyclone Diverts to Surat-Akole; Dam Water Levels Rise in Nashik


नाशिककरांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. हवामान खात्याने नाशिक शहर आणि त्र्यंबकेश्वर परिसरात तब्बल ३५० मिलीमीटर पावसाचा, म्हणजेच ‘ढगफुटी’चा धडकी भरवणारा इशारा दिला होता. मात्र, पालघरमध्ये हाहाकार उडवणारा पावसाचा ‘भोवरा’ ऐनवेळी नाशिकच्या वेशीवरून दुसरीक

.

असा टळला नाशिकवरील धोका…

पालघर जिल्ह्यात तब्बल ४५० मिमी पावसाची नोंद करणारा हवामानातील तोच ‘भोवरा’ सोमवारी रात्री त्र्यंबकेश्वर-नाशिक मार्गे सरकण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. यामुळे नाशिकमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला होता. सोमवारी रात्रभर पावसाने शहरात जोरदार हजेरीही लावली. मात्र, मंगळवारी सकाळी हवामानाच्या स्थितीत मोठा बदल झाला. हा भोवरा नाशिककडे न येता उत्तरेकडे गुजरातच्या सुरतच्या दिशेने आणि दक्षिणेकडे अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले परिसराकडे सरकला आहे. यामुळे नाशिक आणि त्र्यंबकेश्वरवरील ढगफुटीचा धोका बऱ्याच अंशी कमी झाला आहे.

घाटमाथ्यावर अद्यापही धोक्याचा इशारा

शहरावरील संकट टळले असले तरी, आणि मंगळवारी सकाळी नाशिक शहरात पावसाने थोडी विश्रांती घेतली असली तरी घाटमाथ्यावरील परिस्थिती अद्यापही गंभीर आहे. इगतपुरी, कसारा आणि त्र्यंबकेश्वर भागात मुसळधार पाऊस सतत कोसळत आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांनी आणि विशेषतः पर्यटकांनी विनाकारण घराबाहेर किंवा धबधब्यांच्या ठिकाणी जाऊ नये, असे कडक आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

धरणांमध्ये ‘जलसंजीवनी’; पाणीसाठ्यात वेगाने वाढ

काल रात्रीपासून धरण क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे नाशिककरांची वर्षभराची पाण्याची चिंता मिटण्याची चिन्हे आहेत. धरणांतील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत असून सद्यस्थिती खालीलप्रमाणे आहे:

गंगापूर धरण: नाशिक शहराची तहान भागवणारे हे प्रमुख धरण अवघ्या काही दिवसांतच ३७% भरले आहे.

भावली धरण: इगतपुरी तालुक्यातील भावली धरणाने ५६% क्षमतेचा टप्पा ओलांडला आहे.

दारणा धरण: या धरणातील पाणीसाठा २१% वर पोहोचला आहे.

एकूण पाणीसाठा: नाशिक जिल्ह्यातील सर्व धरणांमधील एकूण पाणीसाठा आता २८ टक्क्यांवर पोहोचला आहे.

हेही वाचा..

मान्सूनचे रौद्ररूप:मुंबई, पुण्यात पावसाचे थैमान; 90 किमीच्या वाऱ्याने उडवली दाणादाण; 8 जुलैपर्यंत घराबाहेर पडू नका- मुख्यमंत्र्यांचे आवाहन

१६ दिवसांच्या खंडानंतर पुनरागमन केलेल्या मान्सूनने मुंबई, पुणे, ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यांत थैमान घातले. त्यामुळे अनेक वसाहती पाण्याखाली गेल्या. शेकडो घरांमध्ये पाणी शिरले. ९० किमी प्रतितास वेगाने वाहणाऱ्या वाऱ्याने २९१ झाडे उन्मळली. ८ जुलैपर्यंत नागरिकांनी गरज असेल तरच घराबाहेर पडावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. सविस्तर वाचा

नाशिक येथे ढगफुटीचा इशारा, त्र्यंबकेश्वर मंदिर बंद:हवामान खात्याने जारी केला हाय अलर्ट; शाळा – कॉलेज बंद

सलग होणाऱ्या पावसामुळे महाराष्ट्रातील नाशिक आणि त्र्यंबकेश्वर परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. हवामान विभागाने या भागात ‘रेड अलर्ट’ जारी केला असून, पुढील २४ तासांत ३०० मिमीपर्यंत पाऊस पडण्याचा इशारा दिला आहे. तसेच त्र्यंबकेश्वर आणि नाशिक दरम्यान ढगफुटीची शक्यताही वर्तवली आहे. पावसामुळे जिल्हा प्रशासन सतर्क झाले असून, काल रात्रीपासून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. खबरदारीचा उपाय म्हणून, मेटघर किल्ला परिसरातील रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.