Headlines

Sandeep Deshpande Slams CM Devendra Fadanavis Over Missing Link Landslide


मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पावर पहिल्याच पावसात दरड कोसळल्याने विरोधकांनी महायुती सरकारला चांगलेच कोंडीत पकडले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या पडझडीसाठी ‘निसर्गाचे चक्र’ बदलल्याचे कारण दिले होते. आता महाराष्ट्र नवनिर्म

.

ज्यांना टीका करायची आहे त्यांनी पाकिस्तानला निघून जावे

संदीप देशपांडे यांनी सोशल मीडियावर सरकारची खिल्ली उडवली. “मिसिंग लिंकवर दरड कोसळली त्याला नेहरूच जबाबदार आहेत आणि तरीसुद्धा ज्यांना सरकारवर टीका करायची आहे त्यांनी पाकिस्तानला निघून जावे,” अशी पोस्ट देशपांडे यांनी केली.

मिसिंग लिंकवर दुर्घटना

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील मिसिंग लिंकच्या क्षेत्रात मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर ही दुर्घटना घडली होती. येथील ८.९ किलोमीटर लांबीच्या बोगद्याच्या अगदी शेवटी डोंगराचा प्रचंड मोठा भाग कोसळला. दरडीसोबतच तिथला एक भलामोठा सिमेंटचा पिलर थेट मुख्य रस्त्यावर आडवा झाला. या पिलरमध्ये लोखंडी रॉड आणि सिमेंटचे जड बांधकाम असल्याने मुंबईकडे जाणाऱ्या दोन्ही लेन पूर्णपणे ब्लॉक झाल्या होत्या.

मुख्यमंत्र्यांकडून रस्ता मोकळा झाल्याची माहिती..

विरोधकांच्या या चौफेर टीकेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेमागे अभूतपूर्व पाऊस आणि बदललेल्या निसर्गाचे कारण दिले. “या सर्व घटना निसर्गाचे चक्र बदलल्यामुळे घडत आहेत. प्रशासनाची पूर्ण तयारी होती, पण जिथे यापूर्वी कधीच दरड कोसळली नाही, तिथे ती कोसळली,” असा दावा फडणवीसांनी केला. दरम्यान, यंत्रणांनी युद्धपातळीवर काम करून सोमवारी रात्री ११ वाजेपर्यंत रस्त्यावरील १०० टनांचा ढिगारा बाजूला केला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी स्वतः रस्ता मोकळा झाल्याचा व्हिडीओ शेअर करत वाहतूक पूर्ववत झाल्याची माहिती दिली.

रोहित पवारांचा सरकारवर निशाणा

दरम्यान, या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत, “खड्डे पडले तेव्हा ड्युरॅबिलिटी टेस्ट सांगितली, आता स्लॅब कोसळणंही त्याच टेस्टचा भाग आहे का? मिसिंग लिंकच्या कामात दलाली आणि भ्रष्टाचाराची लिंक झाली असून सुरक्षाच मिसिंग झाली आहे,” असा आरोप केला. गेल्या काही दिवसांच्या पावसाने सरकारच्या दाव्यांची पोलखोल झाल्याचाही दावा त्यांनी केला.

खड्डे सोडून द्या, तिथे अख्खा मिसिंग लिंकच कोसळला- संजय राऊत

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी या दुर्घटनेवरून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करत सडकून टीका केली आहे. “मुख्यमंत्री म्हणतात मिसिंग लिंकवर दोन खड्डे पडलेत, पण आज त्यांनी स्वतः जाऊन पाहावे; खड्डे सोडून द्या, तिथे अख्खा मिसिंग लिंकच कोसळला आहे,” अशा शब्दांत राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केले होते. सविस्तर वाचा

हेही वाचा..

मान्सूनचे रौद्ररूप:मुंबई, पुण्यात पावसाचे थैमान; 90 किमीच्या वाऱ्याने उडवली दाणादाण; 8 जुलैपर्यंत घराबाहेर पडू नका- मुख्यमंत्र्यांचे आवाहन

१६ दिवसांच्या खंडानंतर पुनरागमन केलेल्या मान्सूनने मुंबई, पुणे, ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यांत थैमान घातले. त्यामुळे अनेक वसाहती पाण्याखाली गेल्या. शेकडो घरांमध्ये पाणी शिरले. ९० किमी प्रतितास वेगाने वाहणाऱ्या वाऱ्याने २९१ झाडे उन्मळली. ८ जुलैपर्यंत नागरिकांनी गरज असेल तरच घराबाहेर पडावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. सविस्तर वाचा

नाशिक येथे ढगफुटीचा इशारा, त्र्यंबकेश्वर मंदिर बंद:हवामान खात्याने जारी केला हाय अलर्ट; शाळा – कॉलेज बंद

सलग होणाऱ्या पावसामुळे महाराष्ट्रातील नाशिक आणि त्र्यंबकेश्वर परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. हवामान विभागाने या भागात ‘रेड अलर्ट’ जारी केला असून, पुढील २४ तासांत ३०० मिमीपर्यंत पाऊस पडण्याचा इशारा दिला आहे. तसेच त्र्यंबकेश्वर आणि नाशिक दरम्यान ढगफुटीची शक्यताही वर्तवली आहे. पावसामुळे जिल्हा प्रशासन सतर्क झाले असून, काल रात्रीपासून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. खबरदारीचा उपाय म्हणून, मेटघर किल्ला परिसरातील रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.