Headlines

आषाढी एकादशीसह गुरू पौर्णिमेचे लागले वेध:आषाढी एकादशी आटोपली की, गुरू पौर्णिमा केली जाणार साजरी‎




आषाढी एकादशीला भू-वैकुंठ पंढरीच्या सावळ्या विठ्ठलाचे दर्शन घेण्याची ओढ सर्व वारकरी, भाविकांना लागली आहे. यात मध्यमवयीनांसह बहुतेक ज्येष्ठ नागरिक पुरुष व महिला भाविकांचा समावेश आहे. आषाढी एकादशी आटोपली की, गुरू पौर्णिमा साजरी होणार आहे. यासाठी शहरात आतापासूनच नागरिकांकडून तयारी सुरू करण्यात आली आहे. अगदी विठूरायाचे नामस्मरण करण्यासाठी टाळ, मृदुंग, विणा, ढोलकी, तबला दुरुस्त किंवा खरेदी केला जात आहे. यात हार्मोनियमचीही जोड आहेच. नामस्मरण करीत ग्यानबा तुकाराम असा गजर करीत पंढरीच्या दिशेने वारीत चालणारी पावले देहभान, थकवा विसरून जातात. यासाठी शहरासह जिल्ह्यातील भाविक, वारकरी गटागटाने पंढरीच्या दिशेने निघाले आहेत. ज्यांना पायदळ वारी शक्य नाही, ते विशेष रेल्वे, एसटीतून प्रवास करणार आहेत. यासाठी आतापासूनच पुरुष व महिला भाविकांनी रेल्वे, एसटीचे आरक्षण करीत आहेत. किमान २० ते २५ जणांचा गट असल्यामुळे ही वारी म्हणजे आनंदाची अनुभूती ठरेल, असे मत भाविकांनी व्यक्त केले. पंढरीत खाण्यापिण्याची चिंता नाही. पावलागणिक चहा, फळे, फराळ, उर्वरित. पान ४ अडचण नको म्हणून घेणार विशेष खबरदारी पंढरपूर वारीची महिलांनी आतापासून तयारी सुरू केली आहे. महिलांकडून एकमेकींशी संपर्क साधणे, प्रवासाकरिता कोणते साहित्य आवश्यक आहे, त्याची यादी तयार करणे, एकमेकींचे मोबाइल नंबर घेणे, एकत्रितपणे आरक्षण करणे, आदीबाबत नियोजनबद्ध तयारी सुरू आहे. तसेच रुग्णांना औषधी सोबत घेण्यास सांगितले जात आहे. वारीत अडचण नको म्हणून पूर्ण खबरदारी घेतली जात आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *