Headlines

‘श्री शिवाजी’ शारीरिक शिक्षण महाविद्यालयात योग दिन साजरा:प्रा. बी. टी. देशमुख यांना श्रद्धांजली अर्पण, विविध मान्यवरांची उपस्थिती‎




श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालय येथे २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय व जागतिक योग दिनाचे आयोजन श्री शिवाजी शारिरिक शिक्षण महाविद्यालया मधील कार्यरत योगा विभागाच्या वतीने योगा हॉल येथे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी मा. विधान परिषद सदस्य तथा महाराष्ट्र प्राध्यापक संघाचे माजी अध्यक्ष प्रा. बी. टी. देशमुख यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. उपस्थितांनी दोन मिनिटे मौन पाळून त्यांना आदरांजली वाहिली. त्यानंतर आंतरराष्ट्रीय व जागतिक योग दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. सर्वप्रथम प्रास्ताविक भाषण योग मार्गदर्शक डॉ. सरोजनी उंबरकर यांनी केले. त्यांनी आपल्या भाषणात २७ सप्टेंबर २०१५ पासून आयुष मंत्रालयद्वारा २१ जून हा दिवस ‘जागतिक योग दिन’ म्हणून सर्वत्र साजरा केला जातो तसेच भारतीय योग परंपरा कशी श्रेष्ठ आहे याबाबत मार्गदर्शन केले. त्यांनी जागतिक योग दिनाच्या निमित्ताने आयुष मंत्रालयाच्या प्रोटोकाल नुसार प्रार्थनेने योगाभ्यासाची सुरुवात करून शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी सामुहिक योगासने केली. त्यामध्ये प्रात्यक्षिक सत्रात खडे आसन, बैठे आसन पोटावरची आसन, पाठीवरचे आसन, मान, खांदे, कंबर, गुढगे आदींचे सूक्ष्म योगिक व्यायाम शिकवले. तसेच प्राणायाम, ध्यानाभ्यास, अनुलोम विलोम, फुप्फुसाचे व्यायाम, सूर्यनमस्कार इत्यादींबाबत मार्गदर्शन व प्रात्यक्षिक करून घेतले. विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सामूहिक योगाभ्यास करून योगाचे महत्त्व जाणून घेतले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष गावंडे यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात आंतरराष्ट्रीय योग दिनाचे महत्त्व विशद केले. योग ही भारतीय संस्कृतीची जगाला अमूल्य देणगी असून निरोगी व संतुलित जीवनासाठी योग आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच प्रा. बी.टी. देशमुख यांच्या शैक्षणिक, सामाजिक व संघटनात्मक कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख करताना उच्च शिक्षण क्षेत्रातील त्यांचे योगदान प्रेरणादायी असल्याचे मत व्यक्त केले. त्यांच्या निधनाने शैक्षणिक क्षेत्राची मोठी हानी झाल्याची भावना याप्रसंगी त्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन डॉ. सरोजनी उंबरकर यांनी केले. प्रात्यक्षिके महाविद्यालयाच्या बीपीएड या वर्षात शिकत असलेल्या अभय वर्मा, नूतन दिव्या, आचल, नेहा, निलाक्षी, सुमित, शुभम, किसन ठाकूर, आयुष, कपिल, आकाश, मुनशिप, नीता गौरी यांनी करून दाखवली. यावेळी आयक्यूएसी समन्वयक, वरिष्ठ प्राध्यापिका डॉ. पुष्पलता देशमुख महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *