Headlines

Motorists stranded on highways due to repair work, taking 10 to 15 minutes to travel 1 km, police failing to break the gridlock



अहिल्यानगर ते छत्रपती संभाजीनगर महामार्गाच्या दुरुस्तीचे काम सध्या वेगात सुरू असले, तरी नियोजनाच्या अभावामुळे वाहनधारकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. महामार्गाच्या एका बाजूचे डांबरीकरण टप्प्याटप्प्याने केले जात असल्याने, दुसऱ्या बाजूने एकेरी वा

.

शहराच्या हद्दीत असलेल्या या मार्गावरील दुभाजकाच्या नूतनीकरणाचे काम सध्या हाती घेण्यात आले आहे. हे काम करताना रस्त्याच्या मध्योमध सिमेंट काँक्रिटची मोठी वाहने उभी केली जात आहेत. विशेष म्हणजे, या बांधकाम वाहनांमागे किंवा रस्त्यावर कोणतीही पूर्वसूचना देणारा फलक लावण्यात आलेला नाही. त्यामुळे मागून येणाऱ्या वाहनांना अचानक ब्रेक लावावा लागत असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत.

दुसरीकडे, शहरातील मुख्य पत्रकार चौकातही हीच परिस्थिती आहे. चौकाच्या मध्योमध सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. ऐन पावसाळ्यात हे काम काढल्यामुळे त्याचा वेग प्रचंड संथ आहे. येथून दिल्लीगेट आणि मनमाडकडे जाणारी वाहतूक एकाच पट्ट्यातून सुरू आहे. एसटी बसेस, अवजड वाहने, रिक्षा आणि दुचाकी यांच्या एकत्र गर्दीमुळे या परिसरात नेहमीच कोंडी होत आहे. विशेष म्हणजे, याच चौकात शहर वाहतूक शाखेचे कार्यालय आहे. वाहतूक नियमनासाठी दोन पोलीस व ४ होमगार्ड तैनात असतात. मात्र तरीही ही कोंडी फोडण्यात त्यांना अपयश येत असून नागरिकांना रोजच या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

१० दिवसांत तिसऱ्यांदा कोंडी! संभाजीनगर महामार्गावर प्रशासकीय अनास्थेमुळे गेल्या १० दिवसांत तब्बल तिसऱ्यांदा मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. पूर्वसूचनेचे फलक नसणे आणि ऐन गर्दीच्या वेळी रस्त्यातच बांधकाम वाहने उभी करणे यामुळे वाहनधारक हैराण झाले असून, यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी होत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *