Headlines

मंत्री मोहोळांकडून मनपा अधिकाऱ्यांची झाडाझडती:पाणी साचणाऱ्या ठिकाणांवरून पावसाळी तयारीचा घेतला आढावा




केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुणे महानगरपालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. शहरात पाणी साचणाऱ्या ठिकाणांची संख्या कमी करण्याबाबत आणि पावसाळ्याच्या तयारीबाबत त्यांनी अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. पुणेकरांना कोणतीही समस्या येऊ नये, असे स्पष्ट निर्देश मोहोळ यांनी दिले. केंद्र आणि राज्य सरकारकडून निधी उपलब्ध असतानाही गेल्या तीन वर्षांत शहरातील पाणी साचणाऱ्या ठिकाणांची संख्या किती कमी केली, असा प्रश्न मोहोळ यांनी उपस्थित केला. महापालिका अधिकाऱ्यांनी १२० पैकी ८५ ठिकाणांवर कामे केल्याचा दावा केला. यावर मोहोळ यांनी, “कामे झालेल्या ८५ ठिकाणांपैकी किती ठिकाणी पाणी साचले नाही?” असा प्रतिप्रश्न केला, ज्यावर अधिकाऱ्यांकडे ठोस उत्तर नव्हते. गेल्या आठवडाभरात पुण्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचल्याचे समोर आले होते. या पार्श्वभूमीवर दिल्लीहून परतताच मोहोळ यांनी आपत्कालीन व्यवस्थापनासाठी बैठक घेतली. या बैठकीला महापौर मंजूषा नागपुरे, उपमहापौर परशुराम वाडेकर, स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले, गटनेते गणेश बिडकर, विरोधी पक्ष नेते निलेश निकम, आयुक्त नवल किशोर राम यांच्यासह महापालिकेच्या विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. मोहोळ यांनी अधिकाऱ्यांना सांगितले की, लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला लोकांना उत्तरे द्यावी लागतात. पावसाचा ट्रेंड बदलला असून कमी वेळेत अधिक पाऊस होत आहे. या दृष्टीने काय तयारी केली आहे, अशी विचारणा करत पुढील काही वर्षांचा विचार करून हे प्रश्न सोडवावे लागतील, असे त्यांनी स्पष्ट केले. आवश्यक त्या सर्व यंत्रणा पुरवण्यासाठी आम्ही तयार आहोत, तुम्ही पुणेकरांना कोणतीही अडचण येणार नाही, असे काम करा, असेही मोहोळ म्हणाले. बैठकीत सिंहगड रस्त्यावरील आपत्कालीन कक्ष त्वरित सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच, नदीपात्रात विशेष लक्ष देऊन फ्लड सेन्सरची संख्या वाढवण्याबाबत सूचना दिल्या. वॉर्ड अधिकाऱ्यांनी स्थानिक पातळीवर नागरिकांसाठी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असेही सांगण्यात आले. पुढील बैठकीत ८५ ठिकाणांचे पाऊस असतानाचे फोटो उपलब्ध करून देण्याचे निर्देश मोहोळ यांनी दिले. कमी वेळात अधिक पाऊस होत असल्याने शहरात खड्डे पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे खड्ड्यांची माहिती मिळताच लगेचच ते बुजवण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवण्याची सूचनाही त्यांनी महापालिका अधिकाऱ्यांना केली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *