![]()
‘तू काकाला का बोललीस’ म्हणून पत्नीला जाब विचारत तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीने गावठी कट्ट्यातून तीन गोळ्या झाडल्या. पैकी एक गोळी कानाला चाटून गेली, तर दुसरी गोळी पाठीत लागल्याने विवाहिता गंभीर जखमी झाली. लोहा शहरातील शिक्षक कॉलनीत सोमवारी मध्यरा
.
लोहा येथे शिक्षक कॉलनी परिसरातील विशाल जाधव व त्याची पत्नी अर्चना जाधव यांच्यात सोमवारी मध्यरात्री जोरदार वाद झाला. हा वाद जास्तच वाढत गेल्यानंतर संतालेल्या विशालने पत्नीला लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच कमरेला लावलेले गावठी पिस्तूल काढून तिच्यावर गोळीबार केला. रागाच्या भरात त्याने पत्नीवर सलग तीन गोळ्या झाडल्या. पैकी एक गोळी अर्चनाच्या कानाला चाटून गेली, तर दुसरी पाठीत लागली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अर्चनाला कुटुंबियांनी तातडीने नांदेड येथील रुग्णालयात हलवले. घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. फॉरेन्सिक व फिंगर प्रिंट पथकाने पाहणी करून आवश्यक पुरावे संकलित केले.
संशयितावर पेट्रोल पंप लुटीचा गुन्हा दाखल
विशाल जाधव याच्याविरुद्ध मे २०२३ मध्ये पेट्रोलपंप लुटीचा गुन्हा दाखल दाखल असून तो नुकताच जामीनावर सुटला होता . जाधव हा नांदेड येथे खासगी वाहन चालवतो. तो अनेक गुन्ह्यांमध्ये सहभागी होता अशी माहिती पोलिसांनी सांगितली. आरोपीच्या शोधासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पथकासह लोहा पोलिसांची अनेक पथके रवाना केले आहेत.