![]()
मानवाला संसाररुपी सागरात चिंता दूर करण्यासाठी चांगले संस्कार निर्माण करा तसेच आई-वडिलांनी लाखांची इस्टेट किती कमावली. त्यापेक्षा मुलांसाठी मोलाचे संस्कार घडवणे काळाची गरज आहे, असे आवाहन महिला कीर्तनकार हभप दिव्याताई मोरे (बाभुळगाव) यांनी केले. कन्नड तालुक्यातील करंजखेड येथील गणेश गडावर इच्छापूर्ती श्री विघ्नेश्वर गणपती बाप्पा देवस्थान येथे शुक्रवारी संकष्टी चतुर्थीनिमित्ताने एकदिवसीय कीर्तन महोत्सव कार्यक्रमात त्यांनी उपस्थित भाविकांना उपदेश दिला. त्या पुढे म्हणाल्या की, आजच्या आधुनिक युगात कोण किती संपत्ती कमावते याला महत्त्व नसून आपण आपल्या पाल्यांना कसे संस्कार देता यावर तुमचे समाजात स्थान ठरत असते. इंटरनेटच्या जमान्यात संस्कार आणि जुन्या परंपरा जपणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचेही त्या म्हणाल्या. यावेळी सुरमाळ नवनाथ देवस्थानचे महंत नीळकंठ गिरी महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती. ते म्हणाले की, श्री विघ्नेश्वर गणपती बाप्पाच्या मंदिराचे बांधकाम सुरू आहे. मंदिर सार्वजनिक लोकवर्गणीतून उभे राहते. त्यासाठी मदत करण्यासाठी सहकार्य करावे. संकष्टी चतुर्थीनिमित्त दुपारी बारा वाजता सामुदायिक आरती घेण्यात आली. जाधववाडी- गवारेवाडी येथून टाळ-मृदंगांच्या गजरात दिंडीचे आगमन होताच सरपंच ज्ञानेश्वर सुरडकर, खुशालराव पाटील गाढवे, संतोष शेवगन या तीन दांपत्याच्या हस्ते विधिवत पूजन करून सामुदायिक आरती करण्यात आली. यावेळी हभप राम महाराज ढमाले ( ज्ञानाई वारकरी शिक्षण संस्था सारोळा), हभप संदीप महाराज पवार (रेऊळगाव), हभप भानुदास महाराज (वैजापूर ), हभप गणेश महाराज बाभुळगाव, धनराज मालोदे, चैतन्य महाराज, भागाजी सुरांचे, गोरख महाराज, मातेराव महाराज, भिकन जाधव, योगेश गवारे, देविदास गाढवे, सुभाष जाधव, बाळासाहेब पवार, बंदीनाथ गाढवेसह देवस्थान कार्यकर्ते उपस्थित होते. सकाळपासून दर्शनासाठी येथे भाविकांनी मोठी गर्दी केली होती. उपस्थित भाविकांना साबुदाण्याची खिचडी वाटप करण्यात आली. संस्कारच समाजात तुमची प्रतिष्ठा ठरवतात “पैशांच्या मागे धावणाऱ्या आजच्या युगात संपत्तीपेक्षा मुलांवरील संस्कारांना महत्त्व दिले पाहिजे. तुमचे संस्कारच समाजात तुमची प्रतिष्ठा ठरवतात. इंटरनेटच्या काळात नव्या पिढीला तंत्रज्ञानासोबतच आपल्या जुन्या परंपरा आणि मूल्यांची जोड देणे गरजेचे आहे.’ -हभप दिव्याताई मोरे
Source link
मुलांसाठी मोलाचे संस्कार घडवणे ही काळाची गरज- दिव्याताई मोरे:करंजखेडच्या श्री विघ्नेश्वर गणपती देवस्थान येथे हरिकीर्तनाची सांगता