Headlines

खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीत महायुती, महाविकास आघाडीचे उमेदवार बिनविरोध:गंगापूर येथे वाटाघाटीनंतर 93 उमेदवारांची घेतली माघार, 15 जण बिनविरोध‎



गंगापूर तालुका खरेदी विक्री संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये १५ संचालकांसाठी उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या आज दि. ७ शेवटच्या दिवशी १०८ पैकी ९३ उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यानंतर सर्वच्या सर्व १५ जण बिनविरोध विजयी घोषित करण्यात आले. ही निवडणुक प्रक्र

.

या निवडणुकीत १५ जागांपैकी काँग्रेसला ५, भाजपला ४, राष्ट्रवादी काँग्रेस २, शिवसेना २ व कृष्णा पाटील डोणगावकर यांच्या गटाला २ जागा सोडण्यात आल्या असून विजयी उमेदवारांत काँग्रेसचे लक्ष्मणराव भुसारे, बद्रीनाथ बाराहाते, सुभाष धोत्रे, भाऊसाहेब बाराहाते, ज्योती संदीप कानडे, भाजप नाना जगताप, ज्ञानेश्वर म्हस्के, कृष्णा मुरलीधर एडके, चनघटे जनार्दन कचरू तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्मलाबाई शिवाजी बोडखे यांच्यासह राजाभाऊ भाऊसाहेब दंडे आणि शिवसेनेतर्फे सारंगधर जाधव, रामभाऊ शंकर धोत्रे तर कृष्णा पाटील डोणगावकर गटातर्फे बालचंद जाधव, नारायण सोलणकर यांचा समावेश आहे.

विजयी झाल्यानंतर उमेदवारांनी गुलाल उधळून जल्लोष निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नितीन म्हस्के यांनी काम पाहिले. बिनविरोध विजयी झाल्यानंतर उमेदवारांनी गुलाल उधळून जल्लोष साजरा केला. यावेळी किरण पाटील डोणगावकर, नगराध्यक्ष संजय जाधव, शेषराव जाधव, नंदकुमार गांधीले यांच्यासह सर्वपक्षीय पदाधिकारी उपस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *