Headlines

बियाणे कंपन्यांवर गुन्हे दाखल न केल्यास जोडेमारो आंदोलनाचा इशारा:कृषी अधिकाऱ्यांच्या टेबलावर बोगस बियाण्याचे पोते ठेवून नोंदवला निषेध‎



निकृष्ट व उगवणशक्ती कमी असलेले बोगस बियाणे विक्री केल्याने तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.त्यामुळे सर्व कृषी विक्रेत्यांनी केलेल्या या लुटीच्या निषेधार्थ तालुका काँग्रेस कमिटीने बुधवारी ८ जुलैला तहसीलदार व तालुका कृषी अधिकारी यांना इशार

.

काँग्रेसच्या वतीने प्रशासनाला स्पष्ट इशारा देण्यात आला की, पुढील दोन दिवसांत संबंधित बियाणे उत्पादक कंपन्यांनी शेतकऱ्यांना नवीन बियाणे उपलब्ध करून द्यावे किंवा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, जेणेकरून दुबार पेरणी वेळेत करता येईल. याशिवाय संबंधित कंपन्यांच्या प्रतिनिधींनी तिवसा येथे येऊन शेतकऱ्यांशी संवाद साधावा व प्रशासनाशी समन्वय साधावा. अन्यथा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने जोडे मारा आंदोलन करण्यात येईल. काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या मते, बोगस किंवा निकृष्ट बियाणे विक्री करून शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या कंपन्यांविरुद्ध भारतीय न्याय संहिता बियाणे अधिनियम १९६६, इतर कायद्यांनुसार फौजदारी गुन्हे दाखल करावेत.काँग्रेसच्या वतीने प्रशासनाला स्पष्ट इशारा देण्यात आला की, पुढील दोन दिवसांत संबंधित बियाणे उत्पादक कंपन्यांनी शेतकऱ्यांना नवीन बियाणे उपलब्ध करून द्यावे किंवा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, जेणेकरून दुबार पेरणी वेळेत करता येईल. याशिवाय संबंधित कंपन्यांच्या प्रतिनिधींनी तिवसा येथे येऊन शेतकऱ्यांशी संवाद साधावा व प्रशासनाशी समन्वय साधावा. अन्यथा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने जोडे मारा आंदोलन करण्यात येईल.

शेतकऱ्यांच्या नुकसानाचे पंचनामे करून त्यांना नुकसानभरपाई व आर्थिक मदत देण्यात यावी, तालुक्यातील शेतकरी आधीच वाढलेला उत्पादन खर्च, महागडी बियाणे, खते, पीक विम्याच्या अपुऱ्या मदतीमुळे आर्थिक संकटात सापडले आहेत. अशा परिस्थितीत बोगस बियाण्यांमुळे दुबार पेरणीची वेळ आल्याने शासन व प्रशासनाने हस्तक्षेप करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली.

आंदोलनात तालुका काँग्रेसचे अध्यक्ष वैभव वानखडे, लुकेश केणे, मुकुंद पुनसे, सेतू देशमुख, शालिग्रामजी ढगे, चंदू ढगे, प्रशांत पुनसे, मंगेश पुनसे, संजय पुनसे, दिनेश ढगे, किशोर गोरडे, विश्वजीत बाखडे, सागर वाघमारे, प्रमोद वानखडे, प्रणव गौरखेडे, संजय चौधरी, अतुल गवड, वैभव ढवळे, अजिंक्य चौधरी, सचिन वानखडे, योगेश वानखडे, आदेश वानखडे, राजूभाऊ देशमुख, श्रीकांत माहोरे, आकाश मकेश्वर, गौरव चौधरी, आनंद ढगे, श्रीकांत ढगे, कैलास ठाकरे, रामदासजी पुनसे, शेतकरी, पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

शासन नुकसानभरपाईकडे शेतकऱ्यांचे लागले लक्ष दुबार पेरणीचे संकट उद्भवल्याने हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळणार का, बोगस बियाणे कंपन्यांवर कठोर कारवाई होणार का आणि शासन नुकसानभरपाई देणार का, याकडे आता संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *