![]()
तालुक्यातील लाडकी खोपडा गावासह विविध भागातील शेत शिवारात बुस्टर कंपनीचे हुतुतू सोयाबीन बियाणे निकृष्ट निघाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने हितेश साबळे यांनी बुस्टर कंपनीवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. त्यानंतर कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसह कृषी शास्त्रज्ञांनी शेतीला भेट देऊन पाहणी केली. या पाहणीच्या वेळी आरआरसी संशोधन केंद्राचे कृषी शास्त्रज्ञ पाटील, उपविभागीय कृषी अधिकारी उज्ज्वल आगरकर, कृषी अधिकारी माने, गुणनियंत्रण अधिकारी चौधरी,मंडळ कृषी अधिकारी, कृषी केंद्रचालक, पाहणी दरम्यान संबंधित वाणाची पेरणी केलेले शेतकरी उपस्थित होते. या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने हितेश साबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार या पाहणीदरम्यान शेतकऱ्यांनी शेतातील परिस्थिती अधिकाऱ्यांसमोर मांडत, पेरणीनंतर उगवण कमी झाल्यामुळे मोठे नुकसान झाल्याची माहिती दिली. निरीक्षणादरम्यान प्राथमिक स्वरूपात बुस्टर कंपनीच्या हुतुतू वाणाबाबत तक्रारींची नोंद घेतली. शेतकऱ्यांनी या वाणामुळे आर्थिक फटका बसल्याचा आरोप करत संबंधित कंपनीविरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली. या वेळी शेतकऱ्यांनी कृषी शास्त्रज्ञ व उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांकडे बुस्टर कंपनीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा, या वाणामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी,अशी मागणी हितेश साबळे यांनी केली. शेतकऱ्यांनी सांगितले की, दोषी आढळल्यास संबंधित कंपनीवर कठोर कायदेशीर कारवाई करून भविष्यात अशा प्रकारे शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही, याची शासनाने खबरदारी घ्यावी. कृषी विभागाने नमुने व पंचनाम्यांच्या आधारे पुढील कारवाई केली जाईल, असे या वेळी सांगण्यात आले.
Source link
सोयाबीन बियाणे निकृष्ट निघाल्यामुळे बुस्टर कंपनीवर गुन्हे नोंदवा- साबळे:बियाणे कंपन्यांवर गुन्हे दाखल नकेल्यास जोडेमारो आंदोलनाचा इशारा