Headlines

महिला बचतगटांचा आढावा:महिला बचतगटांनी जेम पोर्टलद्वारे व्यापक बाजारपेठ उपलब्ध करून घ्यावी- रहाटकर




महिला बचत गटांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा ‘जेम’ पोर्टलवर नोंदणी करून आपल्या उत्पादनांना व्यापक बाजारपेठ उपलब्ध करून घ्यावी. महानगरपालिकेने बचत गटांसाठी आधुनिक विक्री स्टॉल उभारावेत, अर्थसंकल्पात महिलांसाठी विशेष योजनांसाठी निधीची तरतूद करावी, अशी सुचना अमरावती भेटीदरम्यान महानगर पालिकेतील महिला बचत गटांच्या सक्षमीकरण, आर्थिक स्वावलंबन आणि शासनाच्या विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणी संदर्भात आयोजित आढावा बैठकीत राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी दिली.रहाटकर यांच्या अध्यक्षतेखाली अमरावती महानगरपालिकेच्या विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात झालेल्या बैठकीत महिला बचत गटांच्या माध्यमातून राबवण्यात येणारे उपक्रम, स्वयंरोजगार, कौशल्य विकास, आर्थिक सक्षमीकरण तसेच महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी करण्यात येणाऱ्या प्रयत्नांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. संबंधित अधिकाऱ्यांनी बचत गटांच्या प्रगतीसह भविष्यातील नियोजनाचे सादरीकरण केले.यावेळी मार्गदर्शन करताना विजया रहाटकर म्हणाल्या की, महिला बचत गट हे ग्रामीण व शहरी भागातील महिलांच्या आर्थिक आणि सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी माध्यम आहे. महिलांना उद्योग, व्यवसाय, प्रशिक्षण, विपणन सुविधा आणि शासनाच्या विविध योजनांचा लाभ प्रभावीपणे मिळणे आवश्यक आहे. देशभरात सुमारे एक कोटी महिला बचत गट कार्यरत असून त्यांच्याशी कोट्यवधी महिला जोडल्या गेल्या आहेत. ‘लखपती दीदी’ योजनेमुळे अनेक महिलांनी आर्थिक स्वावलंबनाचा मार्ग स्वीकारला असल्याचे त्यांनी सांगितले. बैठकीपूर्वी हाटकर यांनी महानगरपालिकेच्या परिसरात महिला बचत गटांनी उभारलेल्या उत्पादन प्रदर्शनाला भेट दिली. स्टॉलवरील विविध उत्पादनांची पाहणी करून त्यांनी महिलांच्या कौशल्याचे कौतुक केले आणि उत्पादने उत्कृष्ट दर्जाची असल्याचे नमूद केले. या बैठकीस महापौर श्रीचंद तेजवानी, खा. डॉ. अनिल बोंडे, विभागीय आयुक्त नयना गुंडे, उपमहापौर सचिन भेंडे, स्थायी समिती सभापती अविनाश मार्डीकर, सभागृह नेते चेतन गावंडे, विरोधी पक्षनेते विलास इंगोले, लोकप्रतिनिधी, अधिकारी, महिला व बाल विकास विभागाचे प्रतिनिधी तसेच महिला बचत गटांच्या सदस्यांची उपस्थिती होती.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *