राज्याच्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आधीच राजकीय वातावरण तापलेले असताना, आता त्यात पावसाच्या आणि पुराच्या मुद्द्यावरून प्रचंड ठिणगी पडली आहे. गेल्या चार-पाच दिवसांत मुंबई आणि उपनगरांसह वसई-विरार भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूर
.
वसई-विरारमधील भीषण पूरस्थितीचा मुद्दा उपस्थित करत आमदार भास्कर जाधव यांनी सरकारला जाब विचारण्यास सुरुवात केली. “रहिवासी पुराच्या पाण्यात बुडाले आहेत, पण उत्तर देण्यासाठी सभागृहात कॅबिनेट मंत्री कुठे आहेत?” असा सवाल जाधवांनी उपस्थित केला. यावरून भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी भास्कर जाधव यांच्यावर पलटवार केला. विरोधकांकडून वापरल्या जाणाऱ्या भाषेवर आक्षेप घेत भातखळकर यांनी विरोधकांना सुनावण्याचा प्रयत्न केला. यानंतर मात्र वाद अधिकच पेटला.
लय घमेंडखोर, नुसता कोपऱ्यात बसलाय – भास्कर जाधव संतापले
अतुल भातखळकर यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करताच भास्कर जाधव यांचा पारा चढला आणि त्यांनी भातखळकरांवर अत्यंत आक्रमक शब्दांत हल्लाबोल केला. “तुमचं ज्ञान, तुमची कुवत आणि तुमची झेप लोकांना चांगलीच माहिती आहे. त्यात काही नवीन नाही! लय घमेंडखोर आहात, नुसते कोपऱ्यात बसून प्रत्येक वेळी अहंकार दाखवता. तुम्हाला मध्ये बोलायचा अधिकार कोणी दिला? तुम्ही राम मंदिरात चोऱ्या करणारे आहात. तुमची वागण्याची पद्धत अशी आहे की जणू काही तुम्हालाच सर्व समजतं आणि बाकीच्यांना काही कळत नाही. तुम्ही कोणाला निष्ठा सांगता? तुम्हाला तर आधी पक्षात कोणी घेत नव्हतं आणि आता तुम्ही मला निष्ठा शिकवता?” अशा शब्दांत भास्कर जाधवांनी अतुल भातखळकर यांना सुनावले.
तुमचं वय पाहून बोला – आदित्य ठाकरेंची चेतावणी
भास्कर जाधव आणि अतुल भातखळकर यांच्यातील वाद विकोपाला गेलेला पाहून आमदार आदित्य ठाकरे यांनीही मैदानात उडी घेतली. भातखळकरांवर थेट निशाणा साधत आदित्य ठाकरे अत्यंत आक्रमक रूपात पाहायला मिळाले. आदित्य ठाकरे भातखळकरांना उद्देशून म्हणाले: “तुम्ही आम्हाला काय करायचे ते सांगू नका. राम मंदिर लुटणाऱ्यांनी तर आम्हाला अजिबात सांगू नये. तुम्ही आधी खाली बसा! “सभागृहात काय चाललंय? नीट बोला, नीट बोला. आता तुमचं वय झालंय, त्यामुळे तुमचं वय पाहून बोला!”
अतुल भातखळकरांचा विरोधकांवर पलटवार
या संपूर्ण गदारोळावर आपली बाजू मांडताना भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी विरोधकांच्या भाषेवर तीव्र आक्षेप घेतला. “सरकार अत्यंत संवेदनशीलपणे प्रत्येक चर्चेला उत्तर देत आहे. मात्र, असं असतानाही विरोधकांकडून ‘सरकार बेताल आहे’ अशा पद्धतीची असंसदीय भाषा वापरली जात असेल, तर ते आम्ही अजिबात सहन करणार नाही,” असे भातखळकर यांनी ठणकावून सांगितले.
या दोन्ही बाजूं कडील जोरदार घोषणाबाजी आणि शाब्दिक बाचाबाचीमुळे विधानसभेचे कामकाज काही काळासाठी विस्कळीत झाले होते. पुरग्रस्तांना मदत मिळवून देण्याच्या मुद्द्यावरून सुरू झालेल्या या चर्चेला शेवटी तीव्र राजकीय संघर्षाचे स्वरूप आले.
हे ही वाचा…
राज्यात समान नागरी कायद्याच्या हालचालींना वेग:मुख्यमंत्री फडणवीसांकडून 7 सदस्यीय उच्चस्तरीय समितीची घोषणा; हिवाळी अधिवेशनात कायदा आणण्याची तयारी

महाराष्ट्रात समान नागरी कायदा (Uniform Civil Code – UCC) लागू करण्याच्या हालचालींना राज्य सरकारने मोठा वेग दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत राज्यात समान नागरी कायदा लागू करण्याच्या अनुषंगाने अभ्यास करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली 7 सदस्यीय उच्चस्तरीय समितीची घोषणा केली आहे. या समितीला येत्या 6 महिन्यांत आपला अहवाल सादर करायचा असून, या वर्षीच्या नागपूर हिवाळी अधिवेशनात हा कायदा सभागृहासमोर मांडण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. सविस्तर वाचा…
महाराष्ट्रात कायदा-सुव्यवस्था कोलमडली:सत्ताधाऱ्यांच्या राजाश्रयामुळे भ्रष्टाचार आणि गुन्हेगारीला बळ, अंबादास दानवेंचा सभागृहात घणाघात

महाराष्ट्र विधानपरिषद सभागृहात नियम 259 अन्वये विरोधकांच्या अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना शिवसेना नेते तथा राज्याचे माजी विधान परिषद विरोधी पक्षनेते, आमदार अंबादास दानवे यांनी राज्य सरकारवर चौफेर घणाघात केला. गृह, महसूल, नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम या चार विभागांतील कारभारावर सडकून टीका करत राज्यात कायदा-सुव्यवस्था ढासळली असून भ्रष्टाचार, गुन्हेगारी आणि प्रशासनातील अनागोंदीला सरकारच जबाबदार असल्याचा आरोप दानवे यांनी केला. सविस्तर वाचा…