Headlines

मिशन ॲडमिशन:जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेसाठी ऑनलाईन प्रक्रिया सुरू; विद्यार्थ्यांना 31 जुलैपर्यंत करता येणार अर्ज




भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालय, शालेय शिक्षण व साक्षरता विभागांतर्गत येणाऱ्या जवाहर नवोदय विद्यालयातील इयत्ता 6 वीच्या प्रवेशासाठी (सत्र 2027-28) प्रवेश परीक्षेची घोषणा करण्यात आली आहे. ‘जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा (JNVST-2027)’ ही शनिवार, दिनांक 28 नोव्हेंबर 2026 रोजी ‘केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळा’मार्फत (CBSE) घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 जुलै २०२६ आहे. पात्र आणि प्रतिभावान विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी जास्तीत जास्त संख्येने अर्ज करावे, असे आवाहन ‘पीएम श्री स्कूल जवाहर नवोदय विद्यालय, कन्नड’चे प्राचार्य श्री. भूलन सी. सरोज यांनी केले आहे. प्रवेशासाठी पात्रता निकष अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे व काळजी महत्त्वाच्या लिंक्स आणि अर्ज प्रक्रिया इच्छुक पालकांनी व विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरण्याकरिता आणि सविस्तर माहितीपुस्तिका (Prospectus) डाऊनलोड करण्यासाठी खालील अधिकृत संकेतस्थळांचा वापर करावा: महत्त्वाची टीप: ऑनलाईन अर्ज भरण्यापूर्वी संकेतस्थळावर उपलब्ध असलेली माहितीपुस्तिका काळजीपूर्वक वाचून, त्यातील नियमांनुसारच अचूक माहिती भरावी.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *