Headlines

Madhuri Dixit To Host Kon Honar Crorepati On Sony Marathi & Sony LIV



लोकप्रिय अभिनेत्री आणि नृत्यांगना माधुरी दीक्षित आता ‘कोण होणार करोडपती’ या लोकप्रिय प्रश्नमंजुषा कार्यक्रमाच्या सूत्रसंचालकाच्या भूमिकेत दिसणार आहे. या घोषणेनंतर प्रेक्षकांमध्ये कार्यक्रमाबाबत उत्सुकता वाढली असून, सोशल मीडियावरही माधुरीच्या नव्या भू

.

‘कोण होणार करोडपती’मध्ये सहभागी होण्यामागचं कारण सांगताना माधुरीने केवळ प्रश्नमंजुषेचा खेळ नव्हे, तर स्पर्धकांच्या कथा आणि त्यांच्या स्वप्नांशी जोडले जाण्याची इच्छा व्यक्त केली. “मला सगळ्यात जास्त उत्सुकता होती ती स्पर्धकांच्या कथा आणि त्यांच्या स्वप्नांमधून त्यांच्याशी जोडून घेण्याची. ‘कोण होणार करोडपती’ हा केवळ प्रश्नांची उत्तरं देऊन पैसे जिंकण्याचा कार्यक्रम नाही, तर स्वतःच्या स्वप्नांवर विश्वास ठेवण्याचा, आत्मविश्वासाने पुढे जाण्याचा आणि स्वप्नं पाहण्याचं धाडस करण्याचा एक अनुभव आहे,” असं ती म्हणाली.

इथे मी फक्त स्वतः असणार

अनेक वर्षांपासून अभिनय आणि नृत्याच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या माधुरीसाठी हा कार्यक्रम प्रेक्षकांशी वेगळ्या पद्धतीने संवाद साधण्याची संधी ठरणार आहे. तिच्या मते, अभिनेत्री म्हणून एखाद्या व्यक्तिरेखेत शिरावं लागतं; मात्र सूत्रसंचालक म्हणून ती स्वतःच्या स्वभावात प्रेक्षकांसमोर येणार आहे.

“प्रेक्षकांना माझी एक अधिक सहज आणि उत्स्फूर्त बाजू पाहायला मिळेल. अभिनेत्री म्हणून आपण एका व्यक्तिरेखेत शिरतो; पण इथे मी फक्त स्वतः असणार आहे. माझ्यासमोर बसलेल्या स्पर्धकांशी गप्पा मारता येतील, त्यांच्या कथा ऐकता येतील आणि त्यांना अधिक जवळून जाणून घेता येईल,” असं माधुरीने सांगितलं.

स्पर्धकांच्या कथा ठरणार खास

कार्यक्रमातील प्रत्येक स्पर्धकाच्या स्वप्नांशी जोडलेले भावनिक क्षण, हास्याचे प्रसंग आणि अचानक घडणारे आश्चर्याचे क्षण आपल्यासाठी विशेष असतील, असंही माधुरीने म्हटलं. संवाद साधायला आवडत असल्याने स्पर्धक आणि प्रेक्षकांसोबत हे अनुभव शेअर करण्यासाठी आपण उत्सुक असल्याचं तिने सांगितलं. माधुरी दीक्षितच्या सूत्रसंचालनामुळे ‘कोण होणार करोडपती’मध्ये प्रश्नोत्तरांसोबतच स्पर्धकांच्या आयुष्याच्या कथा आणि त्यांच्या स्वप्नांनाही विशेष स्थान मिळणार आहे.

नोंदणी कशी कराल?

‘कोण होणार करोडपती’मध्ये सहभागी होण्याची संधी मिळवण्यासाठी Sony LIV ॲप किंवा व्हॉट्सॲपच्या माध्यमातून नोंदणी करता येणार आहे. यासाठी +91 85919 75331 या क्रमांकावर नोंदणी प्रक्रिया सुरू आहे. हा कार्यक्रम लवकरच सोनी मराठी आणि Sony LIVवर पाहता येणार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *