Headlines

दगडूशेठ गणपती ट्रस्टच्या गणेशोत्सवाचे वासापूजन उत्साहात:वृंदावनमधील प्रेम मंदिराची भव्य प्रतिकृती साकारणार




श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळाच्या १३४ व्या गणेशोत्सवासाठी वृंदावनमधील प्रेम मंदिराची प्रतिकृती साकारण्यात येणार आहे. या सजावटीचा श्रीगणेशा वासापूजनाने उत्साहात करण्यात आला. उत्सवाची पारंपरिक जागा असलेल्या जय गणेश प्रांगण येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, उपाध्यक्ष माणिक चव्हाण, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस व आमदार हेमंत रासने, सहचिटणीस अमोल केदारी, उत्सव प्रमुख अक्षय गोडसे, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण उपस्थित होते. याशिवाय यतिश रासने, सौरभ रायकर, मंगेश सूर्यवंशी, सचिन आखाडे, अमोल चव्हाण, तुषार रायकर, यंदाचे कलादिग्दर्शक नितेश कुमार, काळे मांडववाले यांसह मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने यांनी सांगितले की, नानाविध वैशिष्ट्यांनी परिपूर्ण असलेल्या या मंदिराची प्रतिकृती सुमारे १०० फूट उंच असेल. ‘जिथे भक्ती प्रेम बनते आणि प्रेम देवत्व बनते’ या संकल्पनेवर आधारित ही भव्य प्रतिकृती साकारण्यात येणार आहे. प्रतिकृतीचा आकार १२० फूट लांब, ९० फूट रुंद आणि १०० फूट उंच असणार आहे. यामध्ये अनेक भव्य खांब असून विविध मूर्ती देखील असतील. गाभारा व मुख्य सभामंडपातील खांबांची रचना सुटसुटीत असल्याने भाविकांना लांबून सहजतेने श्रींचे दर्शन घेता येईल, असेही रासने यांनी नमूद केले. मिशन लक्ष्यवेध योजनेंतर्गत खेळाडू निवड चाचणी १४ व १५ जुलै रोजी मिशन लक्ष्यवेध योजनेंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा प्रतिभा विकास केंद्रासाठी अॅथलेटिक्स, हॉकी आणि रोईंग या खेळांच्या खेळाडू निवड चाचण्यांचे आयोजन दि. १४ व १५ जुलै २०२६ रोजी करण्यात आले आहे. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे-बालेवाडी येथे सकाळी १० वाजता अॅथलेटिक्स व हॉकीच्या निवड चाचण्या होणार आहेत. रोईंगची निवड चाचणी दि. १४ जुलै रोजी सकाळी १० वाजता एमआयटी आर्ट, डिझाईन अँड टेक्नॉलॉजी विद्यापीठ, लोणी काळभोर येथे होईल. २५ वर्षांखालील महाराष्ट्रातील राज्यस्तरीय पदकविजेते किंवा राष्ट्रीय स्तरावरील सहभागी खेळाडू पात्र असून, निवड चाचणीसाठी जन्म दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, अधिवास प्रमाणपत्र, आधार कार्ड, मागील दोन वर्षांतील क्रीडा कामगिरीची प्रमाणपत्रे, मूळ कागदपत्रे, सत्यप्रती आणि तीन पासपोर्ट आकाराचे फोटो सोबत आणावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी सुरेश काकड (८८८८८०६१५८), ज्योती सूर्यवंशी (९०७५०४०३२०), मनीषा माळी (७३९१९६८१९२) किंवा मनीषा दिवेकर (९७६४३८५१५२) यांच्याशी संपर्क साधावा.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *