![]()
क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी शेतकऱ्यांबद्दल केलेल्या विधानावर संतप्त टीका केली आहे. भारत शेतकऱ्यांमुळे सोने कि चिडिया नव्हता असे विधान लोढांनी केले होते. यावर टीका करताना तुपकर म्हणाले की, मंगलप्रभात लोढांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करावा तेवढा कमी आहे. हा देश पूर्वही कृषीप्रधान होता, आजही कृषीप्रधान आहे आणि भविष्यातही कृषीप्रधान राहील. मंगलप्रभात लोढा जी तुमचं हे वक्तव्य शेतकऱ्यांचा अपमान करणारं आहे. तुम्ही हे वक्तव्या मागं घेतलं पाहिजे आणि देशातल्या तमाम शेतकऱ्यांची माफी मागितली पाहिजे. अंबानी अदानीच्या कारखान्यात ज्वारी-बाजरी पिकत नाही तुपकर पुढे म्हणाले की, हा देश स्टार्टअपच्या भरवश्यावर नाही, तर शेतकऱ्यांच्या भरवश्यावर मोठा झाला आहे, हे लक्षात ठेवा. अजून अंबानी-अदानीच्या कारखान्यात ज्वारी-बाजरी-सोयाबीन-कापूस पिकवण्याचं तंत्रज्ञान जन्माला आलेलं नाही. त्याच्यासाठी तुम्हाला आमच्या वावरातंच यावं लागेल. लोढांनी नट-बोल्ट-सिमेंट खावे, अन्न खाऊ नये तुपकर पुढे म्हणाले की, एवढा तुम्हाला शेतकऱ्यांबद्दल तिटकारा वाटतो, तर मंगलप्रभात लोढांनी उद्यापासून आपल्या ताटामध्ये शेतकऱ्यांनी पिकवलेलं अन्न न घेता कारखान्यातून तयार झालेले नट-बोल्ट खावे, सिमेंट खावं. कारखान्यात जे-जे तयार होतं, धातू खावे. शेतकऱ्यांचं अन्न त्यांनी खाऊ नये. तत्काळ शेतकऱ्यांची माफी मामंगा, अन्यथा मलबार हिलला तुमच्या घरासमोर शेतकऱ्यांना घेऊन आम्ही आंदोलन करू. मंगलप्रभत लोढा काय म्हणाले होते? भारताला शेतीमुळे सोने की चिडिया म्हणत नव्हते, तर घरोघरी स्टार्ट अप मुळे भारत सोने की चिडिया म्हणायचे, असे विधान मंगलप्रभात लोढांनी केले होते. लोढांच्या वक्तव्यानंतर नव्या वादाला तोंड फुटले असून यावर टीकेची झोड उठताना दिसत आहे.
Source link
मंगलप्रभात लोढांनी उद्यापासून नट-बोल्ट, सिमेंट खावे:शेतकऱ्यांनी पिकवलेलं अन्न खाऊ नये; रविकांत तुपकरांची संतप्त टीका, म्हणाले- अन्नदात्याची माफी मागा