Headlines

अचूक नोंदींसाठी बीएलओंना नागरिकांचे सहकार्य आवश्यक:इगतपुरीचे तहसीलदार अभिजीत बारवकर यांचे आवाहन‎




भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण मोहिमेत प्रत्येक पात्र नागरिकाची अचूक नोंद होणे आवश्यक असून, बूथ लेव्हल अधिकारी (बीएलओ) यांना नागरिकांनी पूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन तहसीलदार अभिजित बारवकर यांनी केले. तहसील कार्यालयात आयोजित बीएलओ व बीएलए यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी विशेष पुनरीक्षण मोहिमेच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला. बैठकीस निवडणूक शाखेच्या नायब तहसीलदार वर्षा वाघ, नगरपरिषदेचे कार्यालय प्रमुख रमेश राठोड, बांधकाम विभागाचे अभियंता अनिल बैसाणे, पुरवठा निरीक्षक ललित पाटील, उपनगराध्यक्ष मंगेश शिरोळे, नगरसेविका आशा थोरात, निवडणूक शाखेचे अधिकारी, बीएलओ, बीएलए, अंगणवाडी सेविका आणि स्वस्त धान्य दुकानदार उपस्थित होते. यावेळी तहसीलदार बारवकर यांनी घरभेटीद्वारे माहिती संकलित करणाऱ्या बीएलओंनी प्रत्येक पात्र नागरिकापर्यंत पोहोचून मतदार नोंदणी, माहितीची पडताळणी तसेच मृत, स्थलांतरित आणि दुबार मतदारांची नोंद अद्ययावत करण्याचे काम काटेकोरपणे करावे, असे निर्देश दिले. बीएलओ आणि बीएलए यांनी परस्पर समन्वय राखून मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करावी, असेही त्यांनी सांगितले. नागरिकांनी आवश्यक कागदपत्रे वेळेत उपलब्ध करून द्यावीत, अचूक माहिती द्यावी तसेच नाव, पत्ता किंवा इतर तपशीलांमध्ये बदल असल्यास तत्काळ बीएलओंकडे नोंद करावी, असे आवाहन त्यांनी केले. यामुळे मतदार यादी अधिक पारदर्शक, विश्वासार्ह आणि त्रुटीरहित होण्यास मदत होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. घरातील मृत किंवा स्थलांतरित मतदारांची माहिती प्रशासनाला देण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. मतदारांनी नावाची खात्री करावी ^विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण मोहिमेत सर्व नागरिकांनी प्रशासन आणि निवडणूक आयोगाला सहकार्य करावे. प्रत्येक पात्र मतदाराने आपले नाव मतदार यादीत समाविष्ट आहे की नाही, याची खात्री करून आवश्यक असल्यास दुरुस्ती किंवा नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करावी. – भूषण जाधव, नगरसेवक, इगतपुरी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *