“उद्धव ठाकरे यांच्या गटातील खासदार संजय राऊत यांनी खासदारकी वाचवण्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे नेतृत्व स्वीकारले आहे. स्वतःची खासदारकी टिकवण्यासाठी राऊत शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्याची सुपारी वाजवत आहेत,” असा खळबळजनक दावा शिव
.
राऊतांच्या खासदारकीसाठी काँग्रेसची ऑफर?
संजय राऊत यांनी ‘देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असतील, पण एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार नाहीत,’ अशी टीका केली होती. यावर पलटवार करताना नरेश म्हस्के म्हणाले, “संजय राऊतांना कोण मुख्यमंत्री होईल याची काळजी करण्यापेक्षा पुन्हा स्वतः खासदार कसे बनतील याची काळजी लागली आहे. त्यांच्याकडे आता राज्यसभेवर निवडून येण्याइतपत संख्याबळ नाही. मला असे कळले आहे की, राहुल गांधी यांनी राऊतांना शब्द दिला आहे की, ‘जर तुम्ही शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केलात, तर आम्ही तुम्हाला राज्यसभेची खासदारकी देऊ’. म्हणूनच राऊत पवार साहेबांना काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा सल्ला देत आहेत आणि ही सुपारी वाजवण्याचे काम ते करत आहेत.”
“कदाचित संजय राऊत हे काँग्रेससोबत जातील. आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याव्यतिरिक्त त्या पक्षात कुणीही शिल्लक राहणार नाही,” असा टोलाही त्यांनी लगावला.
रामरक्षा आणि हिंदुत्वावरून ठाकरेंवर निशाणा
उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी नागपूर आणि ठाण्यात ‘रामरक्षा पठण’ आणि ‘महारती’ करण्याचे जाहीर केले आहे. यावर म्हस्के यांनी सडकून टीका केली. “ज्यांनी हनुमान चालिसा आणि रामरक्षा म्हणणाऱ्या खासदार नवनीत राणांना जेलमध्ये टाकले, राम मंदिराच्या उद्घाटनाला उपस्थित राहण्यास नकार दिला आणि रामाला विरोध केला, अशा लोकांनी आता रामरक्षेचे नाटक करू नये.”
“ज्यांनी हिरव्यांचे उंबरठे झिजवले आणि कमरेवर हात ठेवून मशिदीमध्ये जाऊन नमाज पठण केले, त्यांना आता रामाचे नाव घेणे शोभत नाही. रामरक्षा कधी वाचली आहे का? पुस्तक उघडून पाहिले आहे का? दादरमधील प्रदर्शनात त्यांना रामरक्षा वाचताही आली नाही, हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले आहे,” अशी टीका त्यांनी केली.
सिद्धिविनायक मंदिर आणि भ्रष्टाचाराचा आरोप
सिद्धिविनायक मंदिराच्या मुद्द्यावर राऊतांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना म्हस्के म्हणाले, “सकाळी उठून एकनाथ शिंदे यांच्यावर भुंकणे हा संजय राऊतांचा एकमेव धंदा झाला आहे. काल विधान परिषदेत एकनाथ शिंदेंनी जो आरोप केला, तो त्यांच्या मित्रपक्षाच्या सवंगड्यांनी (मनसेने) केलेल्या दाव्यावर आधारित होता. तुम्ही स्पष्टीकरण द्यायला हवे होते, पण केवळ वल्गना करू नका.”
कोकणवासीयांसाठी रेल्वे तिकीट खिडक्या आणि सुविधा
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणवासीयांसाठी रेल्वे बुकिंगच्या सुविधांबाबत बोलताना खासदार म्हस्के यांनी काही महत्त्वपूर्ण घोषणा केल्या. “गणेशोत्सवादरम्यान 90% कोकणवासीय गावी जातात. सर्वांना ऑनलाइन बुकिंग शक्य नसल्यामुळे, आपण दोन अतिरिक्त रेल्वे तिकीट खिडक्या आजपासून सुरू केल्या आहेत. याचा प्रवाशांना मोठा फायदा होईल.”
“मंगळूर एक्स्प्रेस, राजधानी एक्स्प्रेस आणि गरीब रथ एक्स्प्रेस या तीन गाड्यांना सावंतवाडी येथे थांबा मिळण्यासाठी रेल्वेने तत्त्वतः मंजुरी दिली आहे. काही दिवसांतच या गाड्या तिथे थांबतील, जो कोकणवासीयांसाठी मोठा दिलासा असेल. ठाणे स्थानकातून कोकणासाठी गाडी सोडण्याच्या मागणीवर विचार सुरू आहे, परंतु सध्या ठाणे स्थानकात अतिरिक्त लाईन आणि कारशेडची कमतरता आहे. नवीन स्टेशन सुरू झाल्यावर या अडचणी दूर होतील.”
डोंबिवलीतील रमेश म्हात्रे प्रकरण
कल्याण-डोंबिवलीतील रमेश म्हात्रे याच्या गुंडगिरीच्या प्रकरणावर बोलताना म्हस्के म्हणाले, “पक्षाने त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याचा शब्द दिला आहे आणि कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. पण जे विरोधक आज टीका करत आहेत, त्यांनीच म्हात्रे यांना 30 वर्षे नगरसेवक, महापौरपदाचा उमेदवार आणि सभागृह नेता बनवले होते. तेव्हा तुमचे डोळे झाकले होते का? तेव्हा ते चांगले आणि आता वाईट कसे?” असा सवाल त्यांनी विरोधकांना विचारला.
हेही वाचा
एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार नाहीत:राज्यात भाजपची सूत्रे बावनकुळेंकडे जातील, संजय राऊतांची राजकीय भविष्यवाणी

“भारतीय जनता पार्टीची वाटचाल देशातील लोकशाही मोडीत काढण्याच्या दिशेने सुरू आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याप्रमाणे भारतातही ‘राष्ट्राध्यक्ष पद्धत’ लागू करण्याच्या हालचाली केंद्रात सुरू आहेत,” असा अत्यंत गंभीर आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. आज मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना राऊत यांनी केंद्रातील भाजप सरकार, २०२९ च्या निवडणुका आणि महाराष्ट्रातील नेतृत्वाबाबत अनेक मोठे राजकीय दावे केले आहेत. येथे वाचा संपूर्ण बातमी