Headlines

अमरावतीत 'हरित अमरावती'साठी वृक्षारोपण:बुद्ध जयंती उत्सव समिती, सुखाय फाउंडेशनचा 'एक वृक्ष-एक जीवन' संकल्प




अमरावती येथे पर्यावरण संवर्धन आणि ‘हरित अमरावती’च्या निर्मितीसाठी बुद्ध जयंती उत्सव समिती आणि सुखाय फाउंडेशनने पुढाकार घेतला आहे. या अंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील रस्ता दुभाजकामध्ये वृक्षारोपण करण्यात आले. हा उपक्रम राष्ट्रीय कार्यक्रमाचा एक भाग होता. यावेळी वाढते तापमान, वृक्षतोड, शहरीकरणामुळे घटणारी हरित संपदा आणि पर्यावरणाचा बिघडलेला समतोल यावर जनजागृती करण्यात आली. उपस्थित नागरिकांनी ‘दिव्य मराठी’च्या आवाहनानुसार “एक वृक्ष-एक जीवन” हा संकल्प करत अमरावती शहर अधिक हिरवेगार करण्याची शपथ घेतली. कार्यक्रमाचे उद्घाटन अमरावतीचे उपविभागीय अधिकारी अनिल भटकर यांच्या हस्ते झाले. महापालिकेचे उपायुक्त नरेंद्र वानखडे अध्यक्षस्थानी होते. प्रमुख अतिथी म्हणून तहसीलदार विजय लोखंडे, शिक्षण विभागाचे लेखाधिकारी मिलिंद देवरे, एलआयसीचे अधीक्षक गजानन गवई, गुरुद्वारा गुरुसिंह सभेचे कार्याध्यक्ष रवींद्रसिंग उर्फ बीट्टू सलूजा, प्राचार्य संजय खडसे, फादर आरोग्य स्वामी, तसेच दोन्ही संस्थांचे पदाधिकारी प्रमोद तलवारे, रणजीत चव्हाण, अनिल गोटे, प्राचार्य सुनील रामटेके, सारिका वानखडे, प्रवीण वानखडे, प्रा. संजय शेंडे आणि अमित आयुष उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून झाली. त्यानंतर उपस्थितांनी त्रिशरण व पंचशील ग्रहण केले. भगवान बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता. यावेळी पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण किती महत्त्वाचे आहे, यावर उपस्थितांनी भर दिला. वृक्ष जगले तरच सृष्टी टिकेल, असा संकल्प यावेळी करण्यात आला. या कार्यक्रमाला आसेगावचे भदंत मास्तवीर बुद्धघोष, धम्मचारी महास्थातम, धम्मचारी प्रियघोष, धम्मचारीनी विद्यासुची, जमाते इस्लामी हिंदचे मौलाना साजिद, हाजी शकील साहेब, सरफराज खान, बबलू खान, जमील खान, आजी-माजी सैनिक असोसिएशनचे प्रदेशाध्यक्ष प्रदीप गायकवाड, समता सैनिक दलाच्या जिल्हा संयोजिका आशाताई इंगळे, गुणवंत कामगार पुरस्कारप्राप्त अरुणकुमार आठवले, सेवानंद वाकोडे, प्रा. डॉ. वासू विके, राजकुमार राजाने, व्यंकटराव खोब्रागडे, पांडुरंग सुर्वे, राष्ट्रपाल घरडे, विजय गणवीर, नाना रंगारी, दिनेश पाटील, मनोज शेगावकर, मनोहर गजभिये, देवानंद पाटील यांच्यासह विविध सामाजिक, शैक्षणिक आणि धार्मिक क्षेत्रातील अनेक मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *