Headlines

केतन अग्रवाल मृत्यू प्रकरण:एसआयएफएफची जलद चौकशीची मागणी, संस्थेने निष्पक्ष तपास आणि कठोर कारवाईची भूमिका मांडली




लोहगड परिसरातील केतन अग्रवाल यांच्या मृत्यू प्रकरणात निष्पक्ष, पारदर्शक आणि जलद चौकशीची मागणी सेव्ह इंडियन फॅमिली फाउंडेशन (एसआयएफएफ)ने केली आहे. दोषींवर कठोर कारवाई व्हावी आणि न्यायप्रक्रियेला विलंब होऊ नये, असेही संस्थेने म्हटले आहे. एसआयएफएफने केतन अग्रवाल यांच्या कुटुंबाप्रती शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत. संस्थेने आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, या प्रकरणात पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींविरोधातील तपास सुरू आहे. तपासातून समोर येणाऱ्या तथ्यांच्या आधारे निष्पक्ष न्याय मिळणे आवश्यक आहे. कोणत्याही गुन्ह्याचे मूल्यमापन आरोपीच्या लिंगावर न करता, गुन्ह्याच्या स्वरूपावर आधारित असावे, असे संस्थेचे मत आहे. पुरुषांवरील गंभीर गुन्ह्यांकडेही तितक्याच संवेदनशीलतेने पाहण्याची गरज असल्याचे एसआयएफएफने नमूद केले. न्यायालयीन प्रक्रियेला होणारा विलंब पीडित कुटुंबासाठी अतिरिक्त मानसिक त्रासदायक ठरतो, असे संस्थेने म्हटले आहे. हत्या प्रकरणांसाठी फास्ट-ट्रॅक न्यायालयांमध्ये वेळबद्ध सुनावणी व्हावी, अशी मागणी करण्यात आली. तसेच, पीडित कुटुंबांना कायदेशीर मदत, आर्थिक सहाय्य आणि समुपदेशन उपलब्ध करून देण्याची मागणीही एसआयएफएफने केली आहे. याव्यतिरिक्त, विवाहापूर्वी कायदेशीर अधिकार आणि जबाबदाऱ्यांबाबत जनजागृती करण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर अभियान राबविण्याची आवश्यकता असल्याचे संस्थेने म्हटले. या प्रकरणात न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण होऊन दोष सिद्ध झाल्यास कोणताही लिंगभेद न करता कठोर शिक्षा व्हावी, अशीही भूमिका एसआयएफएफने मांडली आहे. ‘पुरुषांच्या सुरक्षितते’चा मुद्दा पुन्हा चर्चेत केतन अग्रवाल प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर सेव्ह इंडियन फॅमिली फाउंडेशनने पुरुषांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आणला आहे. हत्या प्रकरणांत पीडिताच्या लिंगाऐवजी गुन्ह्याचे गांभीर्य हा न्यायाचा आधार असावा, अशी भूमिका संस्थेने घेतली. तसेच जलद तपास, फास्ट-ट्रॅक सुनावणी आणि दोषींना कठोर शिक्षेची मागणीही करण्यात आली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *