![]()
जिल्हा परिषद शाळांनी केवळ पाठ्यपुस्तकीय शिक्षणापुरते मर्यादित राहू नये, तर सामाजिक बांधिलकीचे भान ठेवून विविध नावीन्यपूर्ण उपक्रम राबवावेत. शाळा आणि ग्रामपंचायतीच्या अशा उपक्रमांमुळेच गावाचा कायापालट होऊ शकतो, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी येथे केले. अंधानेर येथील जिल्हा परिषद शाळेत राबवण्यात आलेल्या ड्रेन फॉरेस्ट या उपक्रमाची पाहणी केल्यानंतर ते बोलत होते. मतदार पुनरनिरीक्षण कामाची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी विनय गौडा हे कन्नड तालुक्याच्या दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यादरम्यान त्यांनी अंधानेर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला भेट दिली. यावेळी त्यांच्या हस्ते शाळेच्या भव्य पटांगणात वृक्षारोपण करण्यात आले. शाळा आणि ग्रामपंचायतीने संयुक्तपणे उभारलेल्या ड्रेन फॉरेस्टची त्यांनी पाहणी केली. १८ वर्षे पूर्ण झालेल्या नवमतदारांची नोंदणी करणे, दुबार नावे वगळणे ही राष्ट्रीय कर्तव्याची कामे विहित मुदतीत व पूर्ण अचूकतेने पूर्ण करण्यासंदर्भात त्यांनी कर्मचाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. कार्यक्रमाच्या सुरुवातीला तहसीलदार सारिका भगत यांनी प्रास्ताविक करून तालुक्यात सुरू असलेल्या प्रशासकीय कामांची माहिती दिली, तर शाळेतील कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय केवट यांनी केले. शेवटी मंडळ अधिकारी विकास वाघ यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी सरपंच अशोकराव दाबके, माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. तृप्ती राजपूत, डॉ. दिलीपसिंग राजपूत, राजेंद्र नेवगे, मंडळ अधिकारी विकास वाघ, अप्पासाहेब सोनवणे, तलाठी कंचार, ग्रामविस्तार अधिकारी मोरस्कर, मुख्याध्यापक व शिक्षक नारायण दांगट, रघुनाथ पाटील, दीपक सोनवणे, रामभाऊ गुढेकर, सुयश अहिरराव, मच्छिंद्र डिगोडे, मीनाक्षी बडग, आरती बागुल, अष्पाक शेख यांच्यासह ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य उपस्थित होते. वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची मोठी उपस्थिती या महत्त्वपूर्ण दौऱ्याप्रसंगी उपविभागीय अधिकारी संतोष गोरड, गटविकास अधिकारी ओमप्रकाश रामावत, पोलीस निरीक्षक रंगराव सानप, गटशिक्षणाधिकारी श्रीमती सबाहत मोहम्मद, शिक्षण विस्तार अधिकारी मनीष दिवेकर, नायब तहसीलदार दिलीपकुमार सोनवणे, तालुका कृषी अधिकारी संदीप शिरसाठ, तलाठी दीपक एरंडे आदी वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती.
Source link
शाळांनी पाठ्यपुस्तकी शिक्षणापुरते मर्यादित न राहता उपक्रमशील व्हावे:अंधानेरच्या ‘ड्रेन फॉरेस्ट’चे जिल्हाधिकाऱ्यांकडून कौतुक