![]()
इगतपुरी नगरपरिषद हद्दीतील कथरुवंगण या आदिवासी भागात गेल्या दोन वर्षांपासून ५०० मीटर रस्त्याचे काम रखडल्याने अखेर ग्रामस्थांनीच पुढाकार घेत स्वखर्चातून रस्ता उभारण्याचा निर्णय घेतला. रोजंदारीवर उदरनिर्वाह करणाऱ्या ग्रामस्थांनी ७५ हजार रुपयांची वर्गणी
.
या समस्येबाबत ग्रामस्थांनी अनेकदा लोकप्रतिनिधी, संबंधित अधिकारी आणि कंत्राटदार यांची भेट घेऊन रखडलेले काम पूर्ण करण्याची मागणी केली. मात्र वारंवार पाठपुरावा करूनही कोणतीही कार्यवाही न झाल्याने ग्रामस्थांनी स्वतःच रस्ता बांधण्याचा निर्णय घेतला.
वर्गणीतून जमा झालेल्या रकमेतून दोन मिक्सर मशीन, खडी, रेती आणि सहा कामगारांच्या मदतीने अवघ्या एका दिवसात रस्त्याचे काम पूर्ण करण्यात आले. प्रशासनाच्या विलंबामुळे मूलभूत सुविधा उभारण्यासाठी स्वतःच्या पैशांचा वापर करावा लागल्याची खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली.
स्थानिक प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे आदिवासी भागातील नागरिकांवर स्वतःच रस्ता उभारण्याची वेळ आल्याने परिसरात नाराजी व्यक्त होत आहे. रखडलेल्या विकासकामांची चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
ठेकेदाराने दिला होता नकार “मागील कामाचे बिल अद्याप मिळाले नसल्याने पुढील काम करता येणार नाही, असे ठेकेदाराने सांगितले. त्यामुळे अखेर आम्हालाच रोजंदारीच्या पैशातून वर्गणी काढून रस्ता बनवावा लागला. -निवृत्ती भांगरे, ग्रामस्थ