![]()
पावसाळा सुरू असतानाही इगतपुरी नगरपरिषद हद्दीतील गिरणारे गावातील नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. आठवड्यातून केवळ तीन दिवस आणि तेही अवघ्या ३० मिनिटांसाठी पाणीपुरवठा होत असल्याने महिलांनी रस्त्यावर उतरून प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त केली. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, गावात पाणीपुरवठ्याची कोणतीही निश्चित वेळ नसल्याने नागरिकांना दिवसभर पाण्याची प्रतीक्षा करावी लागते. वारंवार तक्रारी करूनही परिस्थितीत सुधारणा होत नसल्याने महिलांनी रस्त्यावर उतरून संताप व्यक्त केला. शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक रोहिदास डावखर यांच्यासमोर समस्या मांडत उपाययोजना करण्याची मागणी केली. यानंतर डावखर यांनी नगरपरिषदेच्या संबंधित कर्मचाऱ्यांशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती दिली. मात्र, वारंवार संपर्क करूनही दीड तास कोणताही कर्मचारी घटनास्थळी न आल्याने त्यांनी नागरिकांसाठी स्वतःहून रात्री १० वाजता पाण्याचा टँकर उपलब्ध करून दिला.
Source link
पाण्यासाठी रस्त्यावर उतरल्या महिला, इगतपुरीतील गिरणारेत नगरपरिषद प्रशासनाच्या कारभारावर संताप