Headlines

औराळा आरोग्य केंद्रासाठी सुसज्ज इमारत बांधा:ग्रामस्थांनी दिले जिल्हाधिकारी विनय गौडा यांना दिले निवेदन‎




येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत जीर्ण व धोकादायक झाली असून, ती तातडीने पाडून तेथे नवीन सुसज्ज इमारत बांधण्यात यावी, या मागणीसाठी ग्रामस्थ व आरोग्य अधिकाऱ्यांच्या वतीने जिल्हाधिकारी विनय गौडा यांना १० जुलै रोजी प्रत्यक्ष भेटीत निवेदन देण्यात आले. औराळाआरोग्य केंद्राची जुनी इमारत दयनीय अवस्थेत आहे. चालू पावसाळ्यात छतामधून मोठ्या प्रमाणावर पाणी गळत असून भिंतींना मोठे तडे गेले आहेत, तसेच स्लॅबचे प्लास्टरही निखळून पडत आहे. कोणतीही मोठी दुर्घटना घडू नये यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून येथे तात्काळ नवीन सुसज्ज इमारत मंजूर करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. याप्रसंगी तहसीलदार सारिका भगत, नायब तहसीलदार काळे, सरपंच विठ्ठल गुजराणे, आरोग्य अधिकारी डॉ. प्रतीक्षा राजपूत, सामाजिक कार्यकर्ते विकास जिवरख, ग्रामसेवक सुजाता गवई, मंडळ अधिकारी निकाळे, वाघ, ग्राम महसूल अधिकारी निलेश राठोड, देविदास बाणाईत, रवी पाटील, अनिल गायके, भारत मिसाळ, रवींद्र निकम, प्रशांत पगारे, रमेश वारे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. आमदार संजना जाधव आणि पालकमंत्री संजय शिरसाठ यांच्याकडे औराळा आरोग्य केंद्राच्या सुसज्ज इमारतीसाठी पाठपुरावा केला आहे. शासकीय प्रक्रियेची पूर्तता करण्यात आली आहे जीर्ण झालेली इमारत पाडण्यासाठी आणि नवीन इमारत उभारण्यासाठी प्रशासकीय पातळीवर जी कायदेशीर प्रक्रिया व कागदपत्रे आवश्यक असतात, त्याची पूर्तता करून आम्ही शासनाकडे पुढील मंजुरीसाठी योग्य तो पाठपुरावा केला असल्याचे आरोग्य अधिकारी डॉ. प्रतीक्षा राजपूत यांनी सांगितले. तर मी जिल्हा परिषद सदस्य असताना या इमारतीसाठी ७ कोटी ८० लाख रुपयांची मंजुरी आणली होती. ९ कोटी १० लाखांची मागणी केली होती; परंतु शासनाकडे पुरेसा निधी उपलब्ध नसल्याने हे काम रखडले असल्याचे माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश गुजराणे यांनी सांगितले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *