Headlines

सटाण्यातील आयुष्यमान आरोग्य मंदिराचे लोकार्पण:आमदार बाेरसेंच्या हस्ते विकासकामांचे भूमिपूजन‎




शहरातील विविध रस्ते विकासकामांचे भूमिपूजन तसेच राजमाता अहिल्यादेवी स्मारक परिसरात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत उभारण्यात आलेल्या नागरी आयुष्यमान आरोग्य मंदिराचे लोकार्पण रविवारी (दि. १२) आमदार दिलीप बोरसे यांच्या हस्ते झाले. यावेळी नगराध्यक्षा हर्षदा पाटील, उपनगराध्यक्ष सुमित वाघ यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी आदिवासी मुलींच्या शासकीय वस्तीगृहाजवळील रस्ता, प्रभाग क्रमांक १ मधील डॉ. सागर शेवाळे हॉस्पिटल परिसर, प्रभाग क्रमांक २ मधील शिवनेरी हौसिंग सोसायटी परिसर, नामपूर रस्ता ते अपंग कल्याण केंद्र पांधी रस्ता, राज्य उत्पादन शुल्क कार्यालयाजवळील रस्ता तसेच प्रभाग क्रमांक ३, ४ आणि ५ मधील विविध रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाच्या कामांचे भूमिपूजन करण्यात आले. या विकासकामांमुळे नागरिकांना दर्जेदार व सुरक्षित रस्त्यांची सुविधा उपलब्ध होणार असून शहराच्या विकासाला अधिक गती मिळेल, असे आमदार बोरसे व नगराध्यक्षा पाटील यांनी सांगितले. कार्यक्रमास शिवसेना गटनेते राहुल पाटील, भाजप गटनेते चेतन रौंदळ, श्री देवमामलेदार गटनेत्या मनीषा जयवंत पवार, विविध विषय समित्यांचे सभापती व उपसभापती, नगरसेवक, मुख्याधिकारी ज्योती भगत-पाटील, तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाचे किरण शेवाळे, डॉ. स्नेहा निकम, आरोग्य विभागातील अधिकारी, डॉक्टर, परिचारिका, नगरपरिषदेचे अधिकारी-कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *