Headlines

वृक्षारोपणातून दिंडीने दिला पर्यावरण संवर्धनाचा संदेश:दिंडीतील वारकऱ्यांनी केले वृक्षारोपण, भिंगारकर नागरिक विठूनामात झाले तल्लीन‎



aआषाढी वारीच्या निमित्ताने पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान केलेल्या श्री संत जनार्दन स्वामी महाराज पायी दिंडीला भिंगारमध्ये दोन दिवसांच्या मुक्कामानंतर रवाना होताना भिंगारकरांनी अत्यंत भावपूर्ण वातावरणात निरोप दिला. दोन दिवस संपूर्ण भिंगार परिसर भक्तिरसा

.

‘जय हरी विठ्ठल… श्री हरी विठ्ठल’, ‘पुंडलिक वरदा हरी विठ्ठल’ आणि ‘श्री ज्ञानदेव तुकाराम’ या अखंड नामघोषाने परिसर दुमदुमून गेला. टाळ, मृदंग, वीणा आणि हरिनामाच्या गजरात वारकरी भक्तिभावाने तल्लीन झाले होते. महिलांनी पारंपरिक फुगड्यांचा फेर धरत भक्तीचा आनंद व्यक्त केला तर उपस्थित नागरिकांनीही विठ्ठल नामाचा जयघोष करत रिंगण सोहळ्यात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. यावेळी छावणी परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पल्लवी विजयवंशी, रोहित चौकसी व त्यांच्या परिवाराच्या हस्ते दिंडीतील पालखीची आरती करण्यात आली. दिंडीप्रमुख हभप उद्धव महाराज आनंदे यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी हरदिन मॉर्निंग ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ, प्रांजली सपकाळ, हेमलता विजयवंशी, संगीता सपकाळ, सर्वेश सपकाळ उपस्थित होते.

हभप उद्धव महाराज आनंदे म्हणाले, वारी म्हणजे चालता-बोलता संस्कार विद्यापीठ आहे. येथे जात, धर्म, पंथ, श्रीमंती-गरीबी असा कोणताही भेद नसतो; सर्वजण विठ्ठलाचे लेकरू म्हणून एकत्र चालतात. हरिनाम, सेवा, त्याग आणि प्रेम हीच वारीची खरी शिकवण आहे. आज पर्यावरण संवर्धनासाठी केलेले वृक्षारोपण हीदेखील विठ्ठल भक्तीच असल्याचे ते म्हणाले. भक्तीबरोबरच सामाजिक जबाबदारीची जाणीव जपत या सोहळ्यात पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. येथील मैदानात वारकऱ्यांच्या उपस्थितीत हभप उद्धव महाराज आनंदे व रोहित चौकसी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

भिंगारकरांच्या आदरातिथ्याने वारकरीही भारावले दोन दिवसांच्या मुक्कामात भिंगारकरांनी वारकऱ्यांची मनोभावे सेवा केली. भिंगारमधील नागरिकांच्या प्रेम, आदरातिथ्य आणि सेवाभावामुळे वारकरीही भारावून गेले. दिंडी भिंगारमधून मार्गस्थ होत असताना अनेकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू दाटून आले. विठ्ठल नामाच्या गजरात आणि टाळ-मृदंगाच्या निनादात दिंडीने पुढील प्रवासाला प्रस्थान केले. वारी ही केवळ भक्तीची नव्हे, तर समाजप्रबोधनाचीही परंपरा असल्याचा संदेश यावेळी देण्यात आला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *