Headlines

'ऑपरेशन टायगर'वर ठाकरे गटाचा प्रहार:6 बंडखोर खासदारांना अरविंद सावंतांचे खरमरीत पत्र, विलीनीकरणाच्या दाव्यावर सवाल




शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत विलीनीकरणाचा दावा केल्यानंतर, महाराष्ट्राच्या राजकारणात आणि दिल्लीत मोठा राजकीय संघर्ष पेटला आहे. या राजकीय घडामोडींना ‘ऑपरेशन टायगर’ असे नाव दिले जात आहे. या पार्श्वभूमीवर, ठाकरे गटाचे संसदीय नेते अरविंद सावंत यांनी 13 जुलै 2026 रोजी खासदार संजय दिना पाटील यांच्यासह सर्व सहा बंडखोर खासदारांना कायदेशीर पत्र पाठवले आहे. या पत्रातून ठाकरे गटाने या खासदारांच्या विलीनीकरणाच्या दाव्यावर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित करत कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे. नेमके प्रकरण काय आहे? 2024च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना (ठाकरे गट) पक्षाच्या ‘मशाल’ या अधिकृत चिन्हावर एकूण 9 खासदार निवडून आले होते. त्यापैकी खालील 6 खासदारांनी जून 2026 मध्ये संसदीय पक्षाच्या बैठकीकडे पाठ फिरवून बंड पुकारले: या 6 खासदारांनी थेट लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे अर्ज करत, ठाकरे गटाचे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत विलीनीकरण झाल्याचा दावा केला. पक्षातील दोन तृतीयांश (2/3) खासदारांनी ही भूमिका घेतल्याने याला ‘ऑपरेशन टायगर’ असे म्हटले जात आहे. अरविंद सावंतांच्या पत्रातील 3 महत्त्वाचे मुद्दे अरविंद सावंत यांनी पाठवलेल्या पत्रात भारतीय राज्यघटनेच्या दहाव्या अनुसूचीतील (पक्षांतरबंदी कायदा) परिच्छेद 4चा स्पष्ट उल्लेख करत, बंडखोरांचा दावा कसा बेकायदेशीर आहे, हे स्पष्ट केले आहे. ठाकरे गटाची आधीच सावधगिरी: दाखल केले ‘कॅव्हिएट’ या फुटीची कुणकुण लागल्याने ठाकरे गटाने आधीच कायदेशीर पावले उचलली होती. अरविंद सावंत, खासदार संजय राऊत आणि अनिल देसाई यांनी दिल्लीत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेऊन ‘कॅव्हिएट लेटर’ दाखल केले होते. यानुसार, “विलीनीकरणाचा कोणताही दावा आल्यास, एकतर्फी निर्णय न घेता आधी मूळ पक्षाची (ठाकरे गटाची) बाजू ऐकून घ्यावी,” अशी विनंती करण्यात आली होती. सध्या कायदेशीर स्थिती काय? लोकसभा अध्यक्षांनी अद्याप बंडखोर खासदारांचा विलीनीकरणाचा दावा मंजूर केलेला नाही किंवा त्यावर अंतिम निर्णय दिलेला नाही. तर कॅव्हिएटमुळे ठाकरे गटाच्या अधिकृत प्रतिनिधींना सुनावणीची संधी देण्यात आली आहे. 13 जुलैचे अरविंद सावंतांचे पत्र हे केवळ एक औपचारिक पत्र नसून, तो बंडखोर खासदारांना दिलेला स्पष्ट कायदेशीर इशारा आहे. लोकसभा अध्यक्षांचा आगामी निर्णय केवळ या 6 खासदारांचे राजकीय भवितव्य ठरवणार नाही, तर पक्षांतरबंदी कायद्याच्या ‘विलीनीकरणाच्या’ संकल्पनेला एक नवा कायदेशीर आयाम देणारा ठरणार आहे. संबंधित बातमी वाचा… एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर जाणार:’ऑपरेशन टायगर’नंतर शिंदेंचा पहिलाच दिल्ली दौरा, भाजप नेत्यांच्या घेणार भेटी
‘ऑपरेशन टायगर’च्या यशस्वीतेनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पहिल्यांदाच दिल्ली दौऱ्यावर जाणार असल्याची चर्चा आहे. या दौऱ्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. नुकत्याच पार पडलेल्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांच्यात महत्त्वाची भेट झाली होती. त्यानंतर आता शिंदे दिल्लीत भारतीय जनता पार्टीच्या ज्येष्ठ नेत्यांच्या गाठीभेटी घेणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आगामी कॅबिनेट मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा रंगलेली असतानाच हा दौरा होत असल्याने राजकीय वर्तुळात हालचालींना वेग आला आहे. एकनाथ शिंदे हे सध्या मुंबईत असून ते दुपारी होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीलाही उपस्थित राहणार आहेत, त्यानंतर अशी माहिती आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *