Headlines

मुलांची मैदाने बिल्डरांच्या घशात घालणार का?:शिंदे-फडणवीस भागीदारीत 'हॉटेल' संस्कृती? 30 टक्के जागा बिल्डरांना देण्याच्या निर्णयावर राऊतांचा संताप




मुंबईसह महाराष्ट्रातील खेळण्याची मैदानातील 30 ते 40 टक्के जागा बिल्डरांना देण्यात येणार आहे. हॉटेल्स, क्लब, मॉल्स निर्माण करत त्यामधून हजारो कोटी रुपये जमा करणार आणि ते आमदार-खासदार फोडण्यासाठी वापरणार. मुलांना खेळण्यासाठी असलेली मैदाने खाण्याची वेळ आली का तुमच्यावर? काय करताय देवेंद्र फडणवीस असा सवाल उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.मुलांच्या मैदानावर डोळा ठेवता आहात? काय सुरू आहे राज्यात? राज ठाकरेंच्या घरासमोर? बाळासाहेब ठाकरे, वीर सावरकर यांच्या स्मारकासमोर तुम्ही हॉटेल्स बांधणार का? असा सवाल राऊतांनी केला आहे. संजय राऊत म्हणाले की, एकनाथ शिंदे काय ठाण्यातील भागीदाराला शिवतीर्थ, आझाद मैदानावर 30 टक्के जागा हॉटेल्ससाठी देणार आहात का? एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस भागीदारी करत हॉटेल्स बांधणार आहेत का? असा सवाल राऊतांनी केला आहे. यावर सरकारने भूमिका स्पष्ट केली पाहिजे, नाहीतर उद्या पालकांना आणि मुलांना मैदाने वाचवण्यासाठी आंदोलन करावे लागेल. उद्योगांसाठी नक्षली संपवले का? संजय राऊत म्हणाले की, विदर्भामध्ये ज्या पद्धतीने खान उद्योगाने त्रास देणं सुरू केले आहे. येटापल्ली तालुक्यातील अनेक जण माझ्याकडे आले त्यांनी मला तिथली परिस्थिती सांगितली. पाण्याचे झरे, तलाव यामध्ये खनीज मिश्रीत पाणी जातंय त्यामुळे लोकांना पिण्यासाठी पाणी नाही. चिखलात अडकून 7 गोमातांचा मृत्यू झाला. हे सर्व करणारी कंपनी जसे काही भाजपची भागीदार आहे असे वागत असल्याचे मला स्थानिकांनी सांगितले. शेतीचे मोठे नुकसान होत आहे, प्रशासन विकले गेले असल्याने खानींच्या मालकांविरोधात तक्रारी घेण्यास कुणी तयार नाही. या उद्योगांनी सत्ताधारी पक्षांना मोठ मोठ्या देणग्या दिल्या आहेत आणि इतर लोकं त्यांच्या पेरोलवर आहे. कंपनीची परवानगी रद्द करा. उद्योगाच्या नावाने झाडे तोडली जात आहेत. नक्षलवाद संपवला म्हणात तो काय खान उद्योगाला मोकळे रान देण्यासाठी संपवला की जनतेसाठी? असा सवाल राऊत यांनी केला आहे. उद्योगांकडून देणग्या घेऊ नका संजय राऊत म्हणाले की, नक्षलवाद्यांचा त्रास हा जनतेला त्रास देणाऱ्याच उद्योगांना होता. त्यांचे आणि या लोकांचे भांडण होते. देवेंद्र फडणवीसांना सामान्य जनतेची आणि शेतकऱ्यांबद्दल काही वाटत असेल तर शेतजमीनी संपवणारे, पाणी खराब करणारे उद्योग बंद करावे. कठोर भूमिका घ्या. जनतेला वाचवा एका उद्योगाकडून देणग्या घेऊ नका, असा टोला राऊत यांनी लगावला आहे. फडणवीसांकडून पंतप्रधान मोदींचा अपमान संजय राऊत म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले होते की अखाती युद्धांचा परिणाम भारतावर होणार नाही. इकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक पूर्ण होऊ शकले नाही याचे खापर 35 दिवसांपूर्वी सुरू झालेल्या अखाती देशातील युद्धावर फोडत आहे, याचा अर्थ ते मोदींचा अपमान करत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *