![]()
जिल्ह्यात ४ ते ८ जुलै दरम्यान झालेल्या पावसामुळे खरीप पेरण्यांनी चांगलाच वेग घेतला होता. मात्र, गेल्या सात दिवसांपासून पावसाने पुन्हा ब्रेक घेतल्याने आणि कडक ऊन पडू लागल्याने खरीप हंगामातील पिके आता काही प्रमाणात पिवळी पडू लागली आहेत. गेल्या वर्षीच्य
.
जून महिन्यातील बहुतांशी दिवस कोरडे गेल्याने सुरुवातीला केवळ २० टक्केच पेरण्या झाल्या होत्या. त्यानंतर जुलैच्या सुरुवातीला झालेल्या पावसामुळे पेरणीचे क्षेत्र ४८ टक्क्यांवर गेले. सध्यास्थितीत जिल्ह्यात उसासह एकूण पेरणी क्षेत्र ३ लाख २३ हजार ७२७ हेक्टरवर पोहोचले आहे. मात्र, गेल्या वर्षी १५ जुलैपर्यंत तब्बल ८६ टक्के खरीप पेरण्या पूर्ण झाल्या होत्या. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, जुलैच्या दुसऱ्या पंधरवड्यात मान्सून पुन्हा सक्रिय होण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण होत असून, जुलैच्या अखेरच्या आठवड्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
कमी ओलावा ठरला पिकांसाठी घातक जुलैच्या सुरुवातीला ४ दिवस चांगला पाऊस झाल्यानंतर अनेक भागांत जमिनीत पुरेशी ओल नसतानाच खाई-घाईने खरिपाच्या पेरण्या करण्यात आल्या. जमिनीमध्ये कमी ओल असल्यामुळे बियाणे रुजले तरी पिकांच्या वाढीच्या प्राथमिक अवस्थेत आवश्यक असणारी ‘वापसा स्थिती’ निर्माण झाली नाही. ओलावा कमी असल्यामुळे मुळांना जमिनीतील अन्नद्रव्ये आणि नत्र शोषून घेता येत नाही. यामुळे पिकांची वाढ खुंटून ती पिवळी पडत आहेत आणि कडक उन्हामुळे करपू लागली आहेत. पिकांना वाचवण्यासाठी तातडीने चांगल्या पावसाची आवश्यकता आहे.
जिल्ह्यात सर्वाधिक पेरण्या केवळ ५ तालुक्यांतच जिल्ह्यात खरीपाच्या सर्वाधिक पेरण्या केवळ पाचच तालुक्यात झाल्या असून, यात शेवगाव (६७ हजार हेक्टर), कर्जत (६० हजार हेक्टर), नेवासे (५६ हजार हेक्टर), पाथर्डी (५५ हजार हेक्टर), जामखेड (५४ हजार हेक्टर). मध्यम पेरणी कोपरगाव (३७ हजार हेक्टर), पारनेर (३५ हजार हेक्टर), राहुरी (३४ हजार हेक्टर), श्रीगोंदे (३२ हजार हेक्टर). सर्वांत कमी पेरणी राहाता (२६ हजार हेक्टर), संगमनेर (२४ हजार हेक्टर), अकोले (२१ हजार हेक्टर), अहिल्यानगर (१९ हजार हेक्टर), श्रीरामपूर (१८ हजार हेक्टर) झाली आहे.