Headlines

सेवानिवृत्त, ज्येष्ठांनी आनंदी जीवनासाठी सेवा कार्य करावे:जिल्हा पेन्शनर्स असोसिएशनच्या मासिक सभेत चंद्रशेखर पंडित यांचे प्रतिपादन‎



जिल्हा पेन्शनर्स असोसिएशनची मासिक सभा आयोजित करण्यात आली. “सभेत साठावे वरीस धोक्याचे’ या विषयावर सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता तथा साहित्यिक चंद्रशेखर पंडित यांनी मनोगत व्यक्त केले. शासकीय कार्यालयातून सेवानिवृत्त झालेल्या पेन्शनर्स आणि ज्येष्ठ नागरि

.

अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष प्राचार्य डॉ. सत्यनारायण बाहेती होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मागील महिन्यात दिवंगत सभासदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर निवृत्तीवेतनधारकांच् या विषयांवर चर्चा करण्यात आली. त्यांना असलेल्या समस्यांचे समाधान सचिव एकनाथराव उके यांनी केले. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा संघटनेचे उपाध्यक्ष रामभाऊ बीरकड, पोस्टल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष व ज्येष्ठ साहित्यिक तुळशीराम बोबडे, पसायदानामृत मासिकाचे संपादक सुरेशराव कुलकर्णी, सहसचिव किशोर बुटोले, ललिता पंडित उपस्थित होते. याप्रसंगी चंद्रशेखर पंडित यांनी एकाच वर्षात लिहिलेल्या चार पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. त्यांनी “देव जसा आहे तसा का आहे’ भाग- १, भाग- २ आणि भाग- ३ तसेच ‘हनुमंत जसे आहेत तसे का आहेत’ ही पुस्तके लिहिली. त्याचबरोबर सुरेश कुलकर्णी यांनी संपादित केलेल्या “पसायदानामृत’ ह्या मासिकाच्या जुलै अंकाचे प्रकाशन करण्यात आले.

सभेत तुळशीराम बोबडे, सुरेश कुलकर्णी यांनीही मनोगत व्यक्त केले. प्राचार्य डॉ. सत्यनारायण बाहेती यांनी संघटनेच्या कार्यात सर्व सभासदांनी जास्तीत जास्त सहकार्य करावे. ज्यामुळे संघटनेला विविध समाज उपयोगी कार्य करण्यासाठी मदत होईल असे आवाहन केले. पाहुण्यांचा परिचय आणि आभार सहसचिव प्रा. किशोर बुटोले यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी कार्यकारिणी सदस्य मोरेश्वर आंबुलकर, प्रा. डॉ. देवकिसन बाहेती, सुनील खोत, साहेबराव काकड, डॉ. एम. आर. इंगळे आदींनी प्रयत्न केले.

लोक सेवा हीच ईश्वर सेवा निवृत्त झाल्यामुळे तयार झालेल्या आठ-दहा तासाच्या रिकाम्या वेळेचे योग्य नियोजन करून सत्कार्यात उपयोगात न आणल्यास पुढे ‘साठी बुद्धी नाठी’ या परिस्थितीचा सामना करावा लागतो. पुढचे आयुष्य दुःख झेलत अंतकाळाला सामोरे जावे लागते. तसेच आपले जीवन हे मौल्यवान असल्याने त्याच्या प्रत्येक मिनिटाचा उपयोग समाजाच्या भल्यासाठी केला पाहिजे. लोक सेवा हीच खरी ईश्वर पूजा समजून घालवावा असे आवाहन चंद्रशेखर पंडित यांनी केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *