Headlines

वरुणराजा रुसला, खत-बियाणे बाजार कोलमडला‎:खते-औषध बाजाराला मोठा फटका, 75 ते 100 मिमी पाऊस झाल्याशिवाय पेरणी न करण्याचे कृषी विभागाचे आवाहन‎



माढा तालुक्यात पर्जन्यवृष्टी न झाल्याने नैसर्गिक जलस्रोत आटले आहेत.एकीकडे शेतातील उभी पिके जळू लागली आहेत तर दुसरीकडे उजनी धरण क्षेत्रात पाऊस झाल्याने धरणात ५० टक्के उपयुक्त पाणीसाठा असूनही सिना नदीत पाणी सोडण्यात आलेले नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या

.

माढा तालुक्यात प्रामुख्याने ऊसाची शेती केली जात असून यंदा १८ हजार ६५ हेक्टर क्षेत्र ऊसाने व्यापले आहे . आठ दहा कांड्यावर ऊस आला असून त्यास पाण्याची नितांत आवश्यकता आहे. परंतु पावसाळा सुरू होऊन दोन महिन्यांचा कालावधी होऊनही शेतीयोग्य पाऊस न झाल्याने ऊस जळू लागला असून इतर पिके मान टाकू लागली आहेत.नदीकाठच्या अनेक गावांमध्ये पाणी खारट असल्याने माणसांसह जनावरांनाही पिण्यायोग्य पाणी मिळत नाही. गतवर्षी पुराने उग्र रूप धारण केलेली सिना नदी यावेळी पूर्णपणे कोरडी ठाक पडली आहे.

प्रतिनिधी | सोलापूर यंदा जुलै महिना निम्मा संपत आला तरी सोलापूर जिल्ह्यात पावसाने दडी मारल्यामुळे खरीप हंगामातील पेरण्या मोठ्या प्रमाणावर खोळंबल्या आहेत. जिल्ह्यात सुमारे ९२ हजार हेक्टर क्षेत्र पेरणीयोग्य असतानाही प्रत्यक्षात ऊसाशिवाय केवळ ३४,९७०.९ हेक्टर क्षेत्रावरच पेरणी होऊ शकली आहे. पावसाअभावी शेतकरी राजा चिंतेत असून, याचा थेट फटका कृषी सेवा केंद्र चालकांना व खत-औषध दुकानदारांना बसला आहे. गेल्या वर्षी याच काळात ९० टक्के खते आणि औषधांची विक्री झाली होती. मात्र यंदा आतापर्यंत केवळ ५ टक्केच विक्री झाल्याने व्यावसायिक निराश झाले आहेत. उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, बार्शी आणि माढा हे तालुके मुख्यत्वे कडधान्य उत्पादनासाठी ओळखले जातात. मात्र, या भागांत पावसाअभावी पेरण्या थांबल्याने बियाण्यांची मागणी कमालीची घटली आहे. परिणामी, बाजारात बियाण्यांच्या दरात ९०० ते १००० रुपयांची मोठी घसरण झाली तरी बाजारात औषधे व खतांच्या दरात काही प्रमाणात वाढ झाली आहे. तालुका पेरणी (हे.) अक्कलकोट १३७४.० बार्शी १०८३५.३ करमाळा ४५५१.० माढा १५३५.१ माळशिरस ४७४४.५ मंगळवेढा १५९२.८ मोहोळ ७४६.६ उ. सोलापूर ४६७.७ पंढरपूर १५२७.० सांगोला ३९४२.१ द. सोलापूर ३६५४.८ एकूण ३४९७०.९ Share with facebook ^उजनी धरणात उपयुक्त आणि मृत मिळून ९० टिएमसी पाणी आहे. ३३ टक्के धरण भरले की सिना नदीत पाणी सोडले जाते. सध्या धरणात पन्नास टक्के उपयुक्त पाणीसाठा असूनही पाणी सोडले जात नाही. नदी क्षेत्रातील गावांमध्ये खारट पाणी असल्याने जनावरांना पिण्यासाठी पाणी नाही. पाण्याअभावी ऊस जळू लागला आहे. शासनाने बोगद्यातून सिना नदीत त्वरित पाणी सोडावे. दिलीप चव्हाण, शेतकरी – उंदरगांव ^माढा तालुक्यात पाऊस नसल्याने ऊसासह इतर पिके जळू लागली आहेत. उजनी पाणलोट क्षेत्रात पाऊस होऊन धरण ५० टक्के भरूनही शासन सिना नदीत पाणी सोडत नाही. पालकमंत्र्यांनी स्वतः लक्ष घालून पाणी सोडावे ,अन्यथा शिवसेनेच्या वतीने उजनी धरणात जलसमाधी आंदोलन करण्यात येईल. पंडित साळुंखे, युवासेना नेते शिवसेना शिंदे गट ^उजनी धरणात सुमारे ५० टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. परंतु पाणी सोडण्याचा निर्णय शासन स्तरावरूनच घेतला जातो. अल-निनोचा प्रभाव वाढून भविष्यात पाऊस न झाल्यास पिण्यासाठी पाणी राखीव ठेवणे गरजेचे होणार आहे. सचिन पवार, कार्यकारी अभियंता – पाटबंधारे विभाग, सोलापूर ^यामध्ये युरिया, डीएपी, एमओपी, एनपीकेएस, एसएसपी आणि कंपोस्ट खतांचा समावेश आहे. गोदामे, घाऊक व किरकोळ विक्रेत्यांकडे खते उपलब्ध असल्याने शेतकऱ्यांनी घाबरून जाऊन खरेदी करू नये. – शुक्राचार्य भोसले, जिल्हा कृषी अधीक्षक उजनी धरणात ३३ टक्केहून अधिक पाणीसाठा झाल्यानंतर सिना नदीत शेतीसाठी आवर्तन सोडले जाते. यावेळी धरणात ५० टक्के उपयुक्त पाणीसाठा असूनही पाणी सोडले जात नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप आहे. तालुक्यातील लोकप्रतिनिधी पक्षफोडीच्या राजकारणात व्यस्त असल्याचा आरोप करत पालकमंत्र्यांनी लक्ष घालून पाणी सोडावे, अशी मागणी केली.

तालुका निहाय पेरणी Share with facebook नियम असूनही पाणी नाही

ऊस जळू लागला किरकोळ विक्रेत्यांकडे खते उपलब्ध

जलसमाधी आंदोलन करू

पाणी सोडण्याचा निर्णय शासन स्तरावरूनच



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *